MP Hemant Patil
MP Hemant Patil Sarkarnama

MP Hemant Patil Slaps Tehsildar: एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन ; शिवसेना खासदाराने तहसीलदाराला झाप झाप झापलं..

Hingoli Lok Sabha Constituency News: इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू...
Published on

Hingoli News: शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना झापल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. " "इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू, एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन," अशा शब्दात खासदार हेमंत पाटलांनी तहसीलदार किशोर यादव यांना धारेवर धरलं.

हेमंत पाटील आणि तहसीलदार यादव यांच्यात शाब्दीक चकमक झाली. "तहसीलदार आमचे फोन घेत नाही, आमच्या अडचणी जाणून घेत नाही," अशा तक्रारी हेमंत पाटलांकडे आल्या आहेत. यावरुन खासदारांनी तहसीलदारांची 'शाळा' घेतली.

MP Hemant Patil
Parliament Monsoon Session : गांधींच्या पुतळ्याजवळ खासदारांनी रात्र काढली जागून ; मोदींच्या विरोधात काँग्रेस, आप आक्रमक

हेमंत पाटील यांनी माहूर तालुक्यातील काही गावांचा आणि शेतशिवाराचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याबाबत अनेकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींमुळे पारा चढलेल्या खासदार हेमंत पाटलांनी तहसीलदारांना धारेवर धरले. "लोकांचे प्रश्न कळत नाहीत का? मस्ती चढलीय का? असे म्हणत त्यांनी तहसीलदारांना सज्जड दम भरला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहूरच्या नुकसानीबाबत माहिती घेत असताना त्यांनाही तूम्ही शहाणपणा शिकवित होता? असे सांगत विविध कारणावरून खासदारांनी तहसीलदारांची खरडपट्टी काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

MP Hemant Patil
Anna Hazare On Manipur Issue: आशेचे दिवे पुन्हा पेटले, पुन्हा मशाल पेटवा ! ; अण्णा हजारेंना ठाकरे गटाचे साकडे

काय म्हणाले खासदार हेमंत पाटील

तुमच्याबाबत शंभर लोकांच्या तक्रारी आहेत . नीट राहा आणि लोकांची कामे नीट करा. मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन, तुम्ही का लंडन येऊन शिकून आलात आहात का, इंग्रजाची औलाद आहात का, येथे माणसं राहतात, प्रत्येकवेळी कायद्याची चौकट सांगत कामे करीत नाहीत. आपण लोकांसाठी आहोत हे लक्षात ठेवा.

दोन दिवसाच्या आत तुमच्याकडून लोकांना मदत झाली पाहिजे. वेगळ्या पद्धतीने सांगायची वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला जास्त मस्ती आणि चरबी आहे. तु्म्ही लोकांचे फोन उचलत नाही, तुम्ही २४ तास बिझी असतात का ? तुम्हाला काय काम असते..इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू ?

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com