Akola Shivsena News : रेल्वे स्थानक प्रवेशद्वाराला महापुरुषांचे नाव देण्यावरून, 'शिवसेने'नंतर 'वंचित'ही आक्रमक!

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावले होते.
Akola Railway Station
Akola Railway StationSarkarnama

Akola City Political News : अकोला येथील रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. यापूर्वी लावण्यात आलेल्या दोन्ही प्रवेशद्वारांची नावे रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आल्याने शिवसेनेने आंदोलन केले. (The entrance was named after Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावले होते. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक होत दुसऱ्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले आहे. शुक्रवारी (ता. १३) रात्रीच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या दोन प्रवेशद्वारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले होते.

विकासाच्या नावाखाली प्रवेशद्वारावरील महापुरुषांची नावे काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन प्रवेशद्वारांना नाव देण्याची मागणी केली होती. मात्र, निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पोलिसांचा विरोध झुगारून आक्रमकपणे आंदोलन केले.

रेल्वे स्थानकावरील एका प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. या वेळी दुसऱ्याही प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लवकरच देण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक होत. निवेदन देऊन आंदोलन केले आणि दुसऱ्या प्रवेशद्वाराला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं आहे.

पोलिस प्रशासनाचा विरोध झुगारून दिलं नाव..

अकोला रेल्वे स्थानक प्रवेशद्वारास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्याची आंबेडकरवादी अनुयायांची मागणी होत होती. परंतु रेल्वेने प्रवेश गेट लोखंडी फ्रेम काढून टाकली होती. वंचित बहुजन युवा आघाडीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांचे नेतृत्वात रेल्वे पोलिस प्रशासनाचा विरोध झुगारून वंचित बहुजन युवा आघाडीने रेल्वे स्थानक प्रवेशद्वारास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचा फलक लावला.

Edited By : Atul Mehere

Akola Railway Station
Akola Vikhe Patil News : नव्या पालकमंत्र्यांचा मुहूर्त निघाला, 'श्रीं’चे दर्शन घेऊन होणार 'ॲक्टिव्ह'!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com