Akola Vikhe Patil News : नव्या पालकमंत्र्यांचा मुहूर्त निघाला, 'श्रीं’चे दर्शन घेऊन होणार 'ॲक्टिव्ह'!

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जिल्ह्याच्या दौऱ्यावरही होते.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilFacebook
Published on
Updated on

Akola District Political News : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार ऑक्टोबर रोजी जाहीर केली आहे. अकोल्यासह सहा जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोल्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. (He was also on a district tour with Devendra Fadnavis)

नवे पालकमंत्री नऊ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जिल्ह्याच्या दौऱ्यावरही होते. मात्र, त्यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी न स्वीकारता ते निघून गेले होते. त्यावेळी अकोलेकरांची निराशा झाली होती. यापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा पदभार असल्याने ते अकोल्याला वेळ देऊ शकत नव्हते. त्यांनी पालकमंत्री म्हणून त्यांनी एकदाच बैठक घेतली होती.

नवीन पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील जनतेला खूप अपेक्षा आहेत. अखेर नव्या पालकमंत्र्यांच्या बैठकीचा दौरा आल्याने अकोलेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू यांना देण्यात आली होती. पालकमंत्री म्हणून बच्चू कडू हे अकोला जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले होते.

दर आठवड्यात कडू यांचा जिल्ह्यात दौरा असल्याने प्रशासनावर त्यांचा वचक निर्माण झाला होता. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे त्यांच्या गृह जिल्ह्यासह अकोल्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. इतर जिल्ह्यांपेक्षा नागपूरकडेच त्यांचे अधिक लक्ष असल्याचे दिसून आले. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून केवळ एका जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले होते.

शहरात दंगल उसळली, पारस येथे मोठी दुर्घटना घडली. मात्र, पाहणीलादेखील देवेंद्र फडणवीस आले नव्हते. विरोधकांकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आले. नुकतेच चार ऑक्टोबर रोजी नव्या पालकमंत्र्यांनी घोषणा करण्यात आल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. दहा दिवसांनंतर नवे पालकमंत्री पदभार स्वीकारून बैठक घेणार आहेत. नव्या पालकमंत्र्यांकडून अकोल्यातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

अंतर वाढलं आणि जबाबदारीही !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा नागपूर असल्याने अडीचशे किलोमीटर असलेल्या नागपुरातून अकोल्याचा कारभार चालत होता. आता राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृह जिल्हा अहमदनगर असल्याने आता अकोला ते नगर असा जवळपास ३०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास नव्या पालकमंत्र्यांना करायचा आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षा अंतर जास्त असल्याने नवे पालकमंत्री अकोल्यावर किती लक्ष ठेवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, अंतर जरी वाढलं असलं तरी नवीन पालकमंत्र्यांकडे अकोल्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांची मोठी जबाबदारी आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Akola News : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरून श्रेयवादाची लढाई; भाजप-काँग्रेस आमनेसामने

मंत्रिपदाबाबत जिल्ह्याची निराशाच...

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. डॉ. रणजीत पाटील यांच्यानंतर चार वर्षांपासून जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. नव्या युती सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता फोल ठरली आहे. जिल्ह्यात भाजपचे विधानसभेवर चार, तर परिषदेवर एक आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची मोठी अपेक्षा होती. मात्र, सध्या तरी ती अपेक्षा भंग झाली आहे.

नवे पालकमंत्री विखे पाटील हे १५ ऑक्टोबर रोजी अकोला येथे येणार आहेत. त्यानंतर ते शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी सकाळपासून प्रशासनासोबत बैठकीचे विविध विषयांवर आयोजन करण्यात आलं आहे.

Edited By : Atul Mehere

Radhakrishna Vikhe Patil
Akola Politics : रणजित पाटील 'ॲक्टिव्ह मोड'वर; मोठा निर्णय घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com