Vijaykumar Gavit big Announcement: आदिवासी विभागातील सर्व रिक्त जागा भरणार: डॉ. गावितांची मोठी घोषणा

Nagpur news | यासाठी 2 हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत
Vijaykumar Gavit big Announcement
Vijaykumar Gavit big AnnouncementSarkarnama

Vijaykumar Gavit big Announcement : आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त पदे येत्या चार महिन्यात भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांनी केली आहे. डॉ. गावित यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील कार्यालयात 62 रोजंदारी कर्मचाऱ्यांना आणि 5 अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (५ मे) नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. (All vacancies in tribal department will be filled by: Dr. Gavit's big announcement)

या भरतीत आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व जात पडताळणी कार्यालये, आश्रमशाळा, वसतीगृहांना बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी 2 हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत. विभागात रिक्त जागांची भरती आणि कार्यालये बारमाही रस्त्यांनी जोडल्यास जनतेला या विभागाच्या सेवा सक्षमपणे पुरविण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी डॉ. गावित यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics)

Vijaykumar Gavit big Announcement
Dabholkar Murder Case : "दाभोलकर, पानसरे, लंकेश अन् कलबुर्गी हत्याकांडाचा तपास न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी"

याचवेळी त्यांनी ‘ड’ यादीमध्ये नाव नसलेल्या आदिवासी कुंटुंबांनी घरांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच यादीत नाव नसलेल्या आणि घरांसाठी अर्ज केलेल्या सर्वांना मंजुरी देवून आदिवासी कुंटुंबियांना पक्की घरे देण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. (Maharashtra latest Political news)

जनतेपर्यंत आदिवासी विकास विभागाच्या सेवा प्रभावीपणे पोहचवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची साथ महत्वाची असते. यासाठी नागपूर विभागाने रोजंदारी आणि अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी गतीने काम केले.आदिवासी विभागाच्या राज्यातील इतर कार्यालयांमध्ये रिक्त, रोजंदारी व अनुकंपा तत्वावर जागा भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.

Edited By - Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com