Dabholkar Murder Case : "दाभोलकर, पानसरे, लंकेश अन् कलबुर्गी हत्याकांडाचा तपास न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी"

The Ratinalist Murder : डॉ. अमित थडानीचे मत; पुस्तकाचे प्रकाशन
Narendra Dabholkar, Govind Pansare
Narendra Dabholkar, Govind PansareSarkarnama
Published on
Updated on

Dabbholkar, Karburgi, Pansare and Gauri Lankesh : सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी चालला आहे, असे स्पष्ट मत 'द रॅशनॅलिस्ट मर्डर' पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी यांनी व्यक्त केले.

Narendra Dabholkar, Govind Pansare
Praniti Shinde News: बेळगावमध्ये राजकारण तापलं; आमदार प्रणिती शिंदेंची सभा उधळली

पुरोगामी विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या तपासातील कच्चे दुवे आणि चुकीच्या तपास पद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे लेखन डॉ. थडाने यांनी केले आहे. त्याचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य आणि विद्याधर नागोर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी थडानी बोलत होते.

यावेळी मान्यवरांनी चारही जणांच्या हत्याकांड प्रकरणात सुरू असलेल्या पोलीस तपासाबाबत संशय व्यक्त केली. तसेच प्रत्येक वेळी आरोपपत्र, संशयित आरोपी बदलत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

Narendra Dabholkar, Govind Pansare
Ajit Pawar : अजित पवार 'रिचेबल'; 'नॉट रिचेबल'च्या अफवांनंतर दौराच जाहीर केला

चारही विचारवंतांच्या हत्येतील युक्तिवाद आणि सरकारी कागदपत्रे वाचले, तर संपूर्ण तपास प्रक्रियेतच गोंधळ असल्याचे मत शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले. वैद्या म्हणाल्या, "पोलिसांनी आधीच दोषींना निश्चित करून माध्यम ट्रायल घेतली आहे. याच कालखंडात झालेल्या इतर विचारवंतांच्या तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले." थडानी यांनीही पोलीस तपासावर आक्षेप घेतला.

Narendra Dabholkar, Govind Pansare
NCP News : राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याची इच्छा असणारे लोक आहेत, पण ते मर्यादित; जयंत पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट !

थडानी म्हणाले, "अनेक वर्षानंतरही पोलिसांना आरोपी निश्चित करता आले नाहीत. प्रत्येक आरोपपत्रातील आरोपी बदलत आहे. त्यांचे रेखाटनही संशयास्पद आहे. अनेकांना मारून मुटकून जबाब नोंदवल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले आहे. प्रत्येकवेळी कथानकही बदलत आहे. रात्रीच्या अंधारात हेल्मेट घालणाऱ्या संशयिताचे रेखाटन तयार करणे ही अजब गोष्ट आहे. पोलिसांनी स्वतःचे कथानक सिद्ध करण्याऐवजी तथ्यांच्या आधारे तपास करणे गरजेचे आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com