AMC : अवाजवी कर रद्द करण्यासाठी हजारो अकोलेकर धडकले मनपावर...

Akola : अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे.
Akola
AkolaSarkarnama

Akola Municipal Corporation News : महापालिकेने वाढविलेला अवाजवी घर कर रद्द करण्यात यावा, चुकीची पाणी करवसुली थांबविण्यासह शहरातील सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरच्यावतीने आज महानगरपालिकेवर हजारो अकोलेकरांनी धडक मोर्चा काढला. (Unauthorized constructions should be authorized)

झोपलेल्या मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अकोला महानगरपालिकेने वाढविलेला अवाजवी घर कर रद्द करण्यात यावा, चुकीची पाणी करवसुली थांबविण्यात यावी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचे सौंदर्यीकरण करून परिसरात घाण कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या.

शहरातील कलावंतांसाठी सांस्कृतिक भवन सुरू करण्यात यावे, मनपा हद्दीतील दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक सेवा देण्यात यावी, अतिक्रमित जागा नियमाकूल करून घरकुलांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी डंपिंग ग्राऊंडची व्यवस्था करण्यात यावी, न्यू तापडिया नगरजवळील रेल्वे गेट उड्डानपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे तसेच मनपा हद्दवाढीत समाविष्ट गावांच्या भागात मूलभूत सुविधा देण्यात याव्या, या मागण्यांचासुद्दा समावेश होता.

झोपलेल्या मनपा (Municipal Corporation) प्रशासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujav Aghadi) अकोला (Akola) महानगराच्यावतीने महानगराध्यक्ष तथा जि.प.सदस्य शंकरराव इंगळे यांच्यासह कलीम पठाण, महिला आघाडी महानगराध्यक्ष वंदना वासनिक, युवा आघाडी महानगराध्यक्ष आशिष मांगुळकर, जय तायडे यांच्या नेतृत्वात आज महानगरपालिकेवर मोर्चा धडकला.

Akola
Akola : पाणी आरक्षण, पूल अन् राजकीय ट्रँगल, भाजप, वंचित, शिवसेनेत रंगले वाकयुद्ध !

या मोर्चात वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, माजी जि.प.अध्यक्ष बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभा शिरसाट, वंचितचे नेते निलेश देव, मनोहर पंजवाणी, माजी गटनेते गजानन गवई, माजी नगरसेविका किरण बोराखडे, प्रा. संतोष हुसे, दामोदर जगताप, अॅड. संतोष राहाटे, माजी सभापती आकाश शिरसाट, शोभा शेळके, सुवर्णा जाधव, सरला मेश्राम यांच्यासह हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महानगरातील नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com