Akola : पाणी आरक्षण, पूल अन् राजकीय ट्रँगल, भाजप, वंचित, शिवसेनेत रंगले वाकयुद्ध !

Fadanvis : ही स्थगिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Bjp, Vanchit and shivsena
Bjp, Vanchit and shivsenaSarkarnama

A political triangle has arisen out of this issue : जिल्ह्यातील राजकारणात सध्या पाणी आरक्षण आणि गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलावर यावरून राजकीय वाकयुद्ध सुरू झाले आहे. भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा राजकीय ट्रँगल या विषयावरून निर्माण झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या ६९ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तेल्हारा तालुक्यातील वान धरणावरून पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, त्यासाठी राजकारण केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

या आरोपावर प्रत्युत्तर देताना भाजपने शिवसेना आमदारांना श्रेयवादाचे राजकारण करू नका अन्यथा पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण गमावून बसाल, असा इशारा दिला आहे. एकीकडे पाणी आरक्षणावरून वाकयुद्ध सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने गांधीग्राम येथील बंद पुलासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गावरील पुलाच्या उद्‍घाटनापूर्वी आंदोलन केले.

या आंदोलनावर भाजपने प्रतिक्रिया देताना हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीने मित्रपक्ष शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात केले काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर वंचितनेही प्रत्युत्तर देताना, भाजप जनप्रतिनिधींची पोलखोल करणारे आंदोलन केल्याने भाजपचे पितळ उघडे पडले असल्यानेच भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याचा टोला लगाविला आहे.

Bjp, Vanchit and shivsena
Akola News: वर्ष झाले; महानगरपालिकेवर प्रशासक राज कायम, इच्छुकांचा तयारीला ब्रेक !

कोण काय म्हणाले?

वंचितचे आंदोलन शिवसेना (Shivsena) आमदार हरवल्यासाठी होते काय, असा प्रश्‍न भाजपने उपस्थित केला आहे. गांधीग्राम आणि गोपालखेड ही दोन्ही गावे बाळापूर विधानसभा मतदारसंघात येतात. गांधीग्रामचा पूल वापरण्यास अयोग्य झाल्याचा तसेच पुलाला तडा गेल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने बंद केला होता. आमदार रणधीर सावरकर यांनी पाठपुरावा करून त्यांचा मतदारसंघ नसतानाही पर्यायी मार्ग तयार करून घेतला.

खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी व कर्तव्याची जाण विसरल्यामुळे वंचितने (Vanchit) जनआंदोलन केले काय, असा प्रश्न भाजप (BJP) प्रवक्ते गिरीष जोशी यांनी उपस्थित केला आहे. गांधीग्राम आणि गोपालखेड ही दोन्ही गावे कोणत्या मतदारसंघात येतात, याचा अभ्यास न करताच आंदोलन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करून खोटी प्रसिद्धी मिळविण्यासाठीही धडपड असल्याचा आरोपही गिरीष जोशी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com