Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama

Amit Deshmukh on Sports Minister : मुंबईला जाताना एका नेत्याचा झेंडा अन् उदगीरला येताना दुसऱ्याच...

Sanjay Bansode : उदगीरमध्ये क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

At that time thoughts of rebellion come in the minds of the leaders : निवडणुकीनंतर ज्या क्षणाला नेते मतदारांना गृहीत धरण्यास सुरुवात करतात, त्यावेळी नेत्यांच्या मनात बंडखोरीचे विचार येतात. तेव्हाच नेते राजकीय विचारांना सोडचिठ्ठी देतात. लोकशाहीत मतदारांशी इमान राखणे हे नेत्यांचे कर्तव्य आहे, असे मत मांडताना आमदार अमित देशमुख यांनी उदगीरमध्ये क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. (Indirectly criticized the Sports Minister Sanjay Bansode)

``उदगीरहून मुंबईकडे जाताना एका नेत्याचा झेंडा आणि मुंबईहून उदगीरकडे येताना दुसऱ्या नेत्याचा झेंडा’, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी क्रीडामंत्र्यावर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच आमचे दैवत, असे सांगत संजय बनसोडे यांनी २०१९ची विधानसभेची निवडणूक लढवली होती.

आता त्याच बनसोडेंनी अजित पवार यांच्यासोबत क्रीडामंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे आमदार देशमुख यांनी उदगीरमध्ये झालेल्या शेतकरी व्यापारी, हमाल, मापारी स्नेह व ऋण निर्देश मेळाव्यात बोलताना कडवट टीका केली. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून झालेल्या राजकीय घडामोडीचा संदर्भ देत, हे का घडले, कोणामुळे घडले, कसे घडले, हे सामान्यांना कळण्यापलीकडचे आहे.

असे असले तरी लोकशाहीत जनतेशी इमान राखणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून लातूर (Latur) जिल्ह्यावर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्यानंतर माजी आमदार दिलीपराव देशमुख यांनी ही कमान सांभाळली. आता आमदार अमित देशमुख यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच निलंगा शहरात नऊ वर्षानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजिला आहे.

Amit Deshmukh
Amit Deshmukh: विलासरावानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवणारे, अमित देशमुख यांचा राजकीय प्रवास

आता उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या मेळाव्यात थेट विरोधकांवर `देशमुखी शैलीत` विरोधकांचा समाचार अमित देशमुख यांनी घेतला आहे. तर पुढील आठवड्यात औशात कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांचा संवाद होतो आहे. जिल्ह्यातील विरोधकांच्या मतदारसंघात जाऊन राजकीय टीकाटिप्पणी करण्यास आमदार अमित देशमुख यांनी सुरुवात केली आहे. यातून ते जिल्ह्यात पुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये (Elections) कॉंग्रेसचेच वर्चस्व राहणार, हाच संदेश विरोधकांना अप्रत्यक्षपण देत आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com