Amit Shah Akola Visit : अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर भाजपमध्ये उमेदवारीवरून तर्कवितर्क !

BJP : काँग्रेसकडून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर विद्यमान खासदार संजय धोत्रे हे सलग चारवेळा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah Akola Visit : विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आलेले गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या अकोला दौऱ्यानंतर अकोला लोकसभेच्या उमेदवारीवरून आता तर्क-वितर्क लावायला सुरुवात झाली आहे. नेमकी कुणाला भाजपकडून उमेदवारी मिळणार, याबाबत अद्यापही साशंकता कायम आहे. असे असले तरी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. मात्र अमित शाह यांनी विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेत उमेदवारी बाबतही चाचपणी केल्याचे बोलले जात आहे.

अकोल्यात भाजपच्या उमेदवारीबद्दल भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळेच आघाडी, युतीतील जागावाटप ठरवले जात आहे. त्याचबरोबर उमेदवारांची चाचपणीसुद्धा केली जात आहे. सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे फोकस केला आहे.

पश्चिम विदर्भातील अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघाकडे पाहण्यात येते. काँग्रेसकडून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर विद्यमान खासदार संजय धोत्रे हे सलग चारवेळा मतदारसंघातून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ खरा चर्चेत राहतो तो प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सलग दहा वेळा आंबेडकरांनी या मतदारसंघातून आपलं नशीब अजमावले आहे. दोन वेळा ते काँग्रेसच्या मदतीने विजय मिळवू शकले. मात्र त्यानंतर भाजपच्या धोत्रेंनी त्यांचा सातत्याने पराभव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah
Amit Shah Akola Visit: शाहांनी जिंकली सगळ्यांची मने; अकोल्यात कार्यकर्त्यांची लॉटरीच लागली...

यावेळी विद्यमान खासदार संजय धोत्रे हे प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढविणार नसल्याचं स्पष्ट आहे. तर भाजपसमोर पुन्हा प्रकाश आंबेडकर यांचं तगडे आव्हान आहे. हेच आव्हान पेलण्यासाठी भाजपला या मतदारसंघात मोठा कस लागणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी ठरवताना मोठी अडचण भाजपपुढे कायम आहे. अनेकांच्या नावाची भाजपमध्ये उमेदवारीसाठी चर्चाही आहे. अनेक जण इच्छुकही आहेत.

सर्वात पहिले नाव येते ते विद्यमान खासदार धोत्रेंचे सुपुत्र अनुप धोत्रे, यासह माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अकोला पूर्वचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर, खामगावचे विद्यमान आमदार आकाश फुंडकर, माजी मंत्री अनंतराव देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ आदींच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. मात्र ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

पश्चिम विदर्भातील लोकसभेच्या मतदारसंघासह पूर्व विदर्भातील एका मतदारसंघासह एकूण सहा मतदारसंघांचा खुद्द गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी अकोल्यात येऊन आढावा घेतला आहे. सहा मतदारसंघाच्या आढाव्यासह त्यांनी भाजपच्या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. या दौऱ्यासाठी यजमान पद असलेल्या अकोला भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. अमित शाह यांनी मतदारसंघाच्या आढावा घेताना उपस्थितांना विजयाचे काही कानमंत्रही दिले.

एकही जागा आपल्याला हातून जाऊ द्यायची नाही असे शाह यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तर बैठकीला उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांकडून शाह यांनी सहाही मतदारसंघांची माहिती घेतली. आता भाजपच्या बैठकीत नेमके कोणत्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले, याची उत्सुकता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. लवकरच अकोला लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्याला उमेदवारी मिळते की, उमेदवार 'आयात' केला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Amit Shah
Amit Shah Akola Tour : अमित शाह येताच ठाकरे गटाचे पदाधिकारी नजरकैदेत; अकोल्यात काय घडलं ?

पश्चिम विदर्भातील अकोला मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. विधानसभेच्या पाच मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. तर महापालिकेतही भाजपची सत्ता होती. विद्यमान खासदार संजय धोत्रे हे सलग चार वेळा या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा पराभव करून निवडून आले आहेत. त्यामुळे पुन्हा भाजपसमोर आंबेडकर यांचे तगडे आव्हान असल्याने भाजपला हा मतदारसंघ राखण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे. त्यामुळेच उमेदवारही तगडाच द्यावा लागणार आहे. त्यासाठी भाजपला उमेदवार ठरवताना मोठा कस लागत आहे.

Edited By : Atul Mehere

Amit Shah
Amit Shah Akola Visit : धीरगंभीर दिसणाऱ्या शाहांनी अख्ख्या सभागृहाला खळखळून हसवले अन॒ रडवलेही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com