Amit Shah Akola Visit : ते आले अन् चमत्कार घडला, सर्वांचे फोन बंद पडले

Loksabha Election 2024 : अमित शाह यांच्या बैठकीतील एकही बाब लीक होऊ नये, याची हॉटेलमध्ये पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. तशी सर्वांना सक्त ताकीद देण्यात आली होती. शिवाय खास यंत्रणेमुळे सर्वांचे फोन आपोआप स्वीच ऑफ झाले.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News :

लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील पाच आणि पूर्व विदर्भातील एक अशा सहा जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अकोल्यात आलेत. शहरापासून जवळच असलेल्या हॉटेल जलसामध्ये शाह दाखल झाले आणि अचानक एक ‘खास यंत्रणा’ कार्यान्वित करण्यात आली. कुणालाच काही कळले नाही, पण बैठकीला आलेल्या जवळपास सर्वच खासदार, आमदार, नेत्यांचे फोन स्वीच ऑफ झाले. एवढेच नव्हे तर बैठकीच्या मुख्य स्थळापासून संबंधित मंत्री, खासदार, आमदारांच्या स्वीय सहायकांनाही दूर ठेवण्यात आले आहे.

Amit Shah
Loksabha Election 2024 : अमित शाह विदर्भ दौऱ्यावर; अकोल्यात रोड शो, लोकसभा मतदारसंघांचा घेणार आढावा

अमित शाह यांच्या अकोला दौऱ्यात अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, अमरावती लोकसभा मतदारसंघांतून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित होणार आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी देशातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा न सुटल्याने पहिल्या यादीत महाराष्ट्राचा एकही उमेदवार नव्हता. जागावाटपाचा कोणताही अधिकृत फार्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) अकोल्यात विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

अमित शाहांना वरील मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर भाजपच्या निवडणूक समितीकडून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्रासाठी उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उमेदवारांच्या नावाची अशा पद्धतीने घोषणा होणार असल्याने या बैठकीतून उगाच कोणत्याही निराधार चर्चांना पेव फुटू नये, अशी सक्त सूचना अमित शाह यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला दिली आहे. त्यामुळे बैठकीतील एक अक्षरही बाहेर जाता कामा नये, अशी सक्त ताकीद आलेल्या सर्व नेत्यांना यापूर्वीच देण्यात आली आहे.

या सूचनेचे स्मरण आज सर्वांना बैठक सुरू होण्यापूर्वी पुन्हा करून देण्यात आले. विशेष म्हणजे बैठकीला सुरुवात होण्याच्या काही सेकंदांपूर्वीच एका 'खास यंत्रणा' कार्यान्वित करण्यात आली व हॉलमध्ये उपस्थित साऱ्यांचेच मोबाईल फोन 'स्वीच ऑफ' झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'खास यंत्रणे'चा दबदबा

नियोजनानुसार अमित शाह बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. व्यासपीठावर केवळ चारच खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), महसूलमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनाच व्यासपीठावर शाह यांच्या बाजूला असलेल्या खुर्च्यांवर स्थान देण्यात आले होते. अगदी अमित शाह यांचे सुरक्षारक्षकही बैठकस्थळाच्या आसपास नव्हते. बैठकीचे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंक करण्यात पूर्णपणे मज्जाव करण्यात आला होता. भाजपचा (BJP) कोणताही नेता बैठकीत बोलत असताना बैठकीशी संबंध नसलेल्या व्यक्तीला ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लाइव्ह अथवा रेकॉर्डेड काहीही मिळणार नाही, यासाठी 'खास यंत्रणा' ठेवण्यात आली होती.

उगाच भाषणबाजी नको!

महाराष्ट्र भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. 'फिर एक बार मोदी सरकार' भाजप महाराष्ट्र सुपर वॉरियर्स हा लेखाजोखा या वेळी बावनकुळे यांनी शाह यांना भेट दिला. शाह यांच्याकडे मोजकाच वेळ असल्याने उगाच भाषणबाजी करू नका, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या होत्या.

(Edited by Avinash Chandane)

R

Amit Shah
Amit Shah Akola Tour : अमित शाह येताच ठाकरे गटाचे पदाधिकारी नजरकैदेत; अकोल्यात काय घडलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com