Akola News : लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोला शहरात दाखल झाले आहेत. शाह यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील अकोल्यात पोहोचले आहेत. शाह आणि फडणवीस यांचे मंगळवारी (ता. 5) अकोल्याच्या शिवणी विमानतळावर आगमन झाले.
शिवणी विमानतळावर महसूलमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह या वेळी उपस्थित होते. शाह यांनी शिवणी विमानतळावर स्वागत स्वीकारल्यानंतर ते थेट शिवणी परिसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचले. तेथे त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शिवणी विमानतळ ते रिधोराजवळ असलेल्या हॉटेल जलसापर्यंत शाह यांचा रोड शो सुरू झाला. निवडक आठ ठिकाणी भाजप (BJP) च्या कार्यकर्त्यांकडून शाह यांचे स्वागत करण्यात आले.
रोड शोनंतर अमित शाह (Amit Shah) शहरापासून जवळच असलेल्या हॉटेल जलसा येथे बैठकीसाठी रवाना झाले. अकोल्यानंतर शाह जळगाव आणि सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अकोला शहराजवळ असलेल्या रिधोरा येथील हॉटेल जलसामध्ये पश्चिम विदर्भातील पाच आणि पूर्व विदर्भातील एक अशा एकूण सहा लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय गृहमंत्री शाह आढावा घेत आहेत.
आढावा बैठकीत शाह यांच्या समतेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासह सहा जिल्ह्यांतील खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मर्यादित वेळ असल्याने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती व वर्धा तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर अशा एकूण सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा शाह यांनी घेण्यास सुरुवात केली. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे आरोग्याच्या कारणाने निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी कोण उमेदवार असेल? याचा शोध शाह यांनी घेतला.
शाह यांनी संभाव्य उमेदवारांची नावे जाणून घेतली. बुलढाण्याची जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या ताब्यात आहे. यवतमाळ-वाशीमची जागा खासदार भावना गवळी यांच्याकडे आहे. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपला हवे आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपने निवडणूक लढवावी, असा आग्रह नेत्यांनी शाह यांच्यापुढे धरला. त्यावर चर्चा सुरू करण्यात आली.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.