Ashok Chavan Resignation : अमित झनक काँग्रेस सोडणार? नेमकी वस्तुस्थिती काय?

Political Earthquake : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर अनेकांची नावे चर्चेत
Amit Zanak & Ashok Chavhan
Amit Zanak & Ashok ChavhanSarkarnama

Risod Congress : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही आमदारही जाणार असल्याची माहीती समोर आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणाऱ्या संभाव्य आमदारांच्या यादीत वाशीम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक यांचे नाव समोर आले होते. आमदार झनक यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले की, असे काही ठरलेले नाही. राज्यातील राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी भूकंपावर भूकंप होत आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Amit Zanak & Ashok Chavhan
युवक काॅंग्रेस बळकटीकरणासाठी आमदार झनक यांचा झंजावात

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील आणखी पाच ते सहा आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या आमदारांमध्ये विश्वजित कदम, अमर राजूरकर, जितेश अंतापूरकर, माधव जवळकर, अमित झनक, अस्लम शेख यांची नावे घेतली जात आहेत. याच यादीतील रिसोड मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या नावाची सध्या जोरात चर्चा होत आहे. मात्र, झनक यांनी याला नकार दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अमित झनक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, काय घडले मला माहिती नाही. आपण सध्या मतदारसंघात आहोत. आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

कोण आहेत अमित झनक

वाशीम जिल्ह्यातील राजकारणात झनक घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून झनक घराण्याची ओळख आहे. अमित झनक यांचे आजोबा रामराव झनक यांनी आमदारकीची हॅट्‌ट्रिक पूर्ण करून विधानसभेत चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर हा वारसा त्यांचे पुत्र आणि आमदार अमित यांचे वडील सुभाष झनक यांनी घेऊन मेडशी मतदारसंघातून आमदारकीची हॅट्‌ट्रिक पूर्ण केली होती. सुभाष झनक यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून एक वर्ष काम केले. सुभाष झनक यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच ‘लालदिवा’ मिळाला होता. सुभाष झनक यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालवण्याची संधी सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक यांना मिळाली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनीही आमदारकीची हॅट्‌ट्रिक पूर्ण केली आहे. अमित झनक हे काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

Edited By : Prasannaa Jakate

R

Amit Zanak & Ashok Chavhan
Washim : काँग्रेसच्या पारंपरिक गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून वऱ्हाडात रणनीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com