Washim : काँग्रेसच्या पारंपरिक गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून वऱ्हाडात रणनीती

BJP's Step : अनंतराव देशमुख यांच्या प्रवेशाने वाढली भाजपची ताकद!
Anantrao Deshmukh.
Anantrao Deshmukh.Sarkarnama
Published on
Updated on

Anantrao Deshmukh : काँग्रेसचा परंपरागत गड म्हणून ओळख असलेला वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये ‘मोदीलाट’ थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखली होती. आता मात्र या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

काँग्रेसकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या काळात विकासापासून कोसोदूर राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Anantrao Deshmukh.
Yavatmal-Washim LokSabha Constituency : भावना गवळींची ‘जायंट किलर’ उपाधी कायम राहील का?

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा निसटता विजय झाला होता. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेसला जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. वाशीम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तीनपैकी दोन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. रिसोड मतदारसंघावर काँग्रेसची पकड आहे. काहीसा अपवाद वगळता मागील तीन पिढ्यांपासून हा मतदारसंघ झनक कुटुंबाच्या ताब्यात आहे.

रिसोड मतदारसंघातील यावेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. यावेळी रिसोड मतदारसंघात सर्वच पक्षांना कडवे आव्हान भेडसावणार आहे. या मतदारसंघाचा समावेश अकोला लोकसभा मतदारसंघात होतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसच्या तुलनेत चांगले मतदान होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशीम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या चारवरून तीन करण्यात आली होती. पूर्वी असलेला मेडशी मतदारसंघ रद्द करून नवीन रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वापार कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात दोनवेळा भाजपचे विजयराव जाधव यांनी प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा आणि झनक घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो.

आमदार अमित झनक यांना तिसऱ्यांदा या मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून माजी आमदार विजयराव जाधव आणि अॅड. नकुल देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. अॅड. देशमुख हे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अनंतराव देशमुख आणि स्व. सुभाष झनक यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे. अनंतराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री तथा वाशीम अकोला लोकसभेचे खासदार राहिले आहेत. अनंतराव कोण आहेत, हे वाशीम-अकोला जिल्ह्यात सांगण्याची गरज नाही.

Anantrao Deshmukh.
Washim : कर्जमुक्तीचे अर्ज शेतकरी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदेंना पाठविणार

वाशीम जिल्ह्यातील अनंतराव देशमुख यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुन्हा एकदा भाजपप्रवेशाने अनंतरावांना उभारी मिळण्याची शक्यता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे सुपुत्र अॅड. नकुल देशमुख यांना रिसोड मतदारसंघाची उमेदवारी मिळू शकते. देशमुख यांच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात भाजपकडून आता कडवी झुंज दिली जाऊ शकते.

रिसोड मतदारसंघातील दोन तालुक्यातील नगरपालिका आणि पंचायत समित्यांवर भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. याचा फायदाही भाजपला होण्याची शक्यता आहे. रिसोड मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे.

Anantrao Deshmukh.
Washim News : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाची निवडणूक ठरणार रंगतदार

वाशीम जिल्ह्याचा रिसोड विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. मोदीलाटेतही या मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक यांनी विजय मिळविला होता. मतदारसंघात मराठा समाजाचे 55 टक्के, मुस्लिम आणि दलित समाजाचे प्रत्येकी 11 टक्के मतदान आहे. या मतदारसंघात कायम जातीय समीकरणावर निवडणूक झाली आहे. मतदारसंघात वंजारी समाजाचे मतदानही 16 टक्क्यांवर आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Anantrao Deshmukh.
Washim : शरद पवार गटच नव्हे, महाविकास आघाडीत संचारला जोश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com