Amol Kolhe On NCP Ajit Pawar: खासदार कोल्हेंची अजित पवार गटाला झोंबणारी टीका; म्हणाले, सध्या त्यांची अवस्था...

NCP Political News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार - अजित पवार गटातला संघर्ष दिवसागणिक टोकदार होत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आता थेट अजित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
Amol Kolhe, Ajit Pawar
Amol Kolhe, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara - Gondia News : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता राजकीय पक्षांमधील हेवेदावेही वाढले आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार - अजित पवार गटातला संघर्ष दिवसागणिक टोकदार होत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आता थेट अजित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी (ता.10) भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या यात्रेदरम्यान अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांवर टीकेची तोफ डागली आहे. कोल्हे म्हणाले,अजित पवार गटाची अवस्था सध्या येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशा शब्दांत कोल्हे यांनी डिवचलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा जोरदारपणे सुरू आहे. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे महाराष्ट्रात 'बिहार पॅटर्न' राबवून आपल्याला मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी केल्याचं माहिती इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.

Amol Kolhe, Ajit Pawar
Mahayuti Vs Mahavikas Aghadi : मराठवाड्यात चालणार 'मराठा पॅटर्न', विदर्भ, मुंबईत कोणता मुद्दा मतं फिरवणार?

यावरुनही खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महायुतीच्या सर्व्हेमध्ये अजित पवारांना फक्त 12 जागा मिळतील असं सांगितलं जात आहे.पण मग बाकीच्या 28 आमदारांचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असल्यानं दादांनी बिहार पॅटर्ननुसार मुख्यमंत्रिपदाची मागणी केली असेल असा दावा कोल्हे यांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांनी इतर पक्षाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवरही थेट भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरीवेळी शरद पवारांसोबत जे ठामपणे उभे राहिलेत, त्याच्याविषयी प्रश्न नाही. मात्र,जे आता वारा बघून उड्या मारण्याच्या तयारीत आहे त्यांच्याबाबत त्या ठिकाणचे कार्यकर्ते आणि पवारसाहेब अंतिम निर्णय घेणार असल्याचंही कोल्हे यांनी सांगितले.

शिवस्वराज यात्रा अजित पवार गटाचे प्रमुख नेते प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्लांत दाखल झाली आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी पटेलांनाही फटकारलं. शिवस्वराज यात्रा ही स्वाभिमानासाठी काढलेली यात्रा आहे. आपण पटेलांवर बोलण्याएवढे मोठे नेते नाही. ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत.परंतु,पटेलसाहेब,आपसे तो ये उम्मीद न थी असंही कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe, Ajit Pawar
Ramdas Athawale And Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनाच्या पुन्हा-पुन्हा धमक्या; आठवले म्हणाले, 'आम्हाला फटका बसला'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com