Amol Mitkari : ठाणेदाराने गणवेशात नेत्याचा वाढदिवस साजरा केला असेल, तर कारवाई निश्‍चित !

Devendra Fadanvis : फडणवीस म्हणाले, आंदोलन करण्याची पद्धत चुकली.
Amol Mitkari and Devendra Fadanvis
Amol Mitkari and Devendra FadanvisSarkarnama

Mumbai Legislative Council News : यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील टाकळी या गावात रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान ठाणेदारावरही काही गंभीर आरोप करण्यात आले. त्या ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी आज सभागृहात केली. (Citizens had protested for the demand of the road)

यासंदर्भात बोलताना आमदार मिटकरी म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहो. पण आजही उमरखेड तालुक्यातील टाकळी या गावासाठी रस्ता नाही. ही खरं तर शोकांतिका आहे. त्यासाठी लोकांनी आंदोलन केले. तर ५९ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. टाकळी हे गाव तंटामुक्त आहे. येथे कधीही भागनगडी झालेल्या नाहीत. पण हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

भडकावू आणि चिथावणी देणारे भाषण केल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला आणि त्यामुळेच हे गुन्हे दाखल केल्याचे सरकारने सांगितले. आधी २३ जानेवारी २०२३ ला मग त्यानंतर २६ जानेवारीला टाकीवर चढून लोकांनी आत्मदनहनाचा प्रयत्न केला. रास्ता रोकोही केला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात उपोषण केले. त्यासाठी पहिले १२ लोकांवर, मग ४७ आणि त्यानंतर ५९ लोकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आमदार मिटकरींनी सभागृहाला दिली.

राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याच्या दबावात ही कारवाई करणयात आली. तेथील ठाणेदार त्या नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सेलिब्रेशन करताना आढळला. ठाणेदाराने त्या नेत्याच्या म्हणण्यावरूनच गुन्हे दाखल केले. आंदोलनकर्त्यांनी शासकीय नुकसान केले नाही सार्वजनिक हितासाठी आंदोलन केले असेल, तर गुन्हे परत घेण्यात येतील, असा शासनाचा जीआर आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री व गृहमंत्री (Home Minister) हे बोलले होते. आता गुन्हे परत घेणार का आणि ठाणेदारावर काय कारवाई करणार, असे प्रश्‍न आमदार मिटकरींनी (Amol Mitkari) केले.

Amol Mitkari and Devendra Fadanvis
Amol Mitkari News: एमआयडीसी व रोजगाराचा प्रश्न गाजला; मिटकरी म्हणाले, विदर्भावरही लक्ष द्या!

यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले. लोकांची मागणी योग्य आहे. पण आंदोलन करण्याची पद्धत चुकली. २६ जानेवारीला राष्ट्रीय कार्यक्रम असतो. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले दोन मोठे राष्ट्रीय सण आहेत. त्या कार्यक्रमात असं करायला नको होतं. ते आंदोलनकर्त्यांनी केले. गंभीर बाब म्हणजे पाण्याच्या टाकीवर चढून अंगावर डिझल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. भडकावू भाषण दिले, त्याचा विचार करू.

आंदोलनकर्त्यांनी नुकसान केलं नसेल तर नक्की गुन्हे वापस घेऊ आंदोलनात नुकसान झालं असेल तर गुन्हे परत घेणार नाही. टाकीवर चढून केलेल्या आंदोनालचे गुन्हे मात्र परत घेणार नाही, असे फडणवीसांनी (Devendra Fadanvis) ठणकावून सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. ठाणेदार खरंच वाढदिवसाच्या कार्यक्रमात गणवेषात सहभागी झाले असेल आणि या प्रकरणात ठाणेदाराचे संगनमत असेल तर त्याच्यावर निश्‍चितपणे कारवाई करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com