Amol Mitkari News : ...अखेर अमोल मिटकरींनी मोठं पाऊल उचललंच; गाडीच्या तोडफोडप्रकरणी राज ठाकरेंचं नाव घेत पोलिसांत तक्रार दाखल

MNS Vs NCP Dispute : आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज म्हटल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. त्यानंतर अकोल्यातही या टीकेचे पडसाद उमटले.
Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama
Published on
Updated on

Akola News : मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जुंपली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट चांगलाच संतापला आहे. त्यानंतर विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेली टीका मनसेच्या जिव्हारी लागली अन् त्याचे तीव्र पडसाद उमटले असून अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी थेट मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे.

यानंतर आता संतापलेल्या अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) मोठं पाऊल उचललं आहे.त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर अखेर मनसेप्रमुख राज ठाकरेंचं नाव घेत तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.30 फोडली.अकोल्यातील विश्रामगृहात ते थांबलेले असताना आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगड मारले तसेच झाडांच्या कुंड्याही फेकल्या.त्यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करताना सुपारीबाज म्हटल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. त्यानंतर अकोल्यातही या टीकेचे पडसाद उमटले.या तोडफोडीनंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस वाद आणखी चिघळला आहे.

आमदार अमोल मिटकरी हे मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्यानंतर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या मनसेच्या हल्ल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राचं नाव घेतात आणि अशाप्रकारे गुंडागर्दी करतात.हा भेकड हल्ला आहे. या हल्ल्यांना मी घाबरत नाही असं त्यांनी ठणकावले होते.

या हल्ल्यावेळी मी अकोला येथील विश्रामगृहात होतो. काहीजण मला भेटायला आले होते. त्यासाठी मी येथे आलो होतो.पण मी आत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला. मी याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार असल्याचा मिटकरींनी इशाराही दिला होता.

Amol Mitkari
Ladki Bahin Yojana : आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होणार? शिंदेंच्या नेत्याचं मोठं विधान

अजित पवार पुण्यात नसतानाही धरणं भरुन वाहिली अशा शब्दांत त्यांनी डिवचलं होतं.यावर विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंनी सुपारी बहाद्दर असा उल्लेख करत झोंबणारी टीका केली होती.

यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून अकोल्यात आता मनसे कार्यकर्त्यांनी थेट मिटकरींची थेट गाडीच फोडली.या तोडफोडीनंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता मिटकरी यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे.

'खळ्ळखट्याक'चे राजकारण नाकारलेले...

महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील, तर हल्लेखोर मनसे सैनिकांवर कडक कारवाई करावी.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी महाराष्ट्राने 'खळ्ळखट्याक'चे राजकारण नाकारलेले आहे.2009 मध्ये 13आमदार असलेला पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्व असलेला हा पक्ष 2024 येता येता केवळ एका आमदाराचा पक्ष झाला आहे असेही ते म्हणाले.

ज्या राज ठाकरे यांनी पिंपरी - चिंचवडचा विकास आमचे नेते अजितदादा पवार यांनी केल्याची स्तुतीसुमने उधळली आहेत.त्यामुळे गजानन काळे यांची बौद्धिक पातळी कमी आहे म्हणून त्यांनी एकदा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन माहिती घ्यावी असा खोचक टोलाही माजी खासदार आनंद परांजपे यांनी लगावला आहे.

Amol Mitkari
Sharad Pawar Vs Ajit Pawar : माढ्यात ट्विस्ट! शिंदे बंधू झुंजणार? शरद पवार गटाचा मोठा डाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com