Amol Mitkari News : आमदार अमोल मिटकरींनी ऐन वेळेवर बदलला रस्ता, काय आहे कारण ?

Maratha Community : मराठा बांधवांशी चर्चा करायला काय हरकत होती.
Amol Mitkari
Amol MitkariGoogle
Published on
Updated on

Akola District Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मिटकरींबाबत मराठा समाजात नाराजी आहे. मिटकरींनी मनोज जरांगे पाटील यांची स्क्रिप्ट कोण लिहून देते, असा सवाल करत आरोप केला होता. (What was the problem in discussing with the Maratha brothers)

आमदार मिटकरी आज जिल्ह्यातील आलेगाववरून अकोल्याकडे जात असताना मराठा बांधव आंदोलन करणार असल्याची माहिती मिटकरींना मिळाली. त्यांनी लागलीच रस्ता बदलला. मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून मिटकरींनी दुसरा रस्ता धरल्याचे मराठा समाजाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन, दौरे आणि सभा घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची स्क्रिप्ट कोण लिहून देते, ते तपासले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी अकोला येथे केले होते. या वक्तव्यावरून मराठा समाजाकडून आमदार अमोल मिटकरी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार अमोल मिटकरी हे काल (ता. २३) आलेगाववरून अकोल्याकडे जात असताना काही मराठा समाज बांधव अंबाशी येथे जमले. परंतु आमदार मिटकरी यांना मराठा बांधव अंबाशी येथे जमल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी आपली गाडी अंबाशी मार्गे न आणता दुसऱ्या मार्गे वळवून मराठा बांधवाशी चर्चा न करता अकोला गाठले.

मिटकरींनी जर तसे विधान केले नसेल तर मराठा बांधवांशी चर्चा करायला काय हरकत होती किंवा स्पष्टीकरण द्यायला काय हरकत होती, असा सवाल मराठा नेत्यांनी केला. मिटकरींना आता सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्याचा सकल मराठा समाज पातूर तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील हे सच्चे कार्यकर्ता असून, त्यांना मराठा समाजाचा मिळणारा मोठा प्रतिसाद काही नेत्यांना बोचत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.

मिटकरींचे स्पष्टीकरण...

आमदार अमोल मिटकरी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण ट्विट करून दिले होते. त्यांनी आपला व्हिडिओ पोस्ट करीत दिलगिरी व्यक्त केली आहे. चुकीच्या वार्तांकनाद्वारे एक मेसेज माझ्याबद्दल जाणीवपूर्वक फिरवला जातोय की, ‘जरांगे पाटील यांचा स्क्रिप्ट रायटर कोण?’, असं अमोल मिटकरींनी म्हटल्याचे वृत्त पसरवले जात आहे. गेल्या वीस वर्षांपासून मी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता राहिलो आहे.

Amol Mitkari
Amol Mitkari News : रावण दहनाला अमोल मिटकरींचा कडाडून विरोध, केली 'ही' मागणी !

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी शिव शाहू यात्रेमध्ये अनेकदा मी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतही होतो. उलट जरांगे पाटील यांच्या सभेबद्दल जी आगपाखड गुणरत्न सदावर्ते यांनी केली. सदावर्ते यांचा स्क्रिप्ट रायटर कोण अशा अनुषंगाने माझं ते वक्तव्य होतं. यात जरांगे पाटील यांचा अपमान होईल, असं वक्तव्य नव्हतं. माझा मराठा आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे मिटकरींनी म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

Amol Mitkari
Amol Mitkari On Borwankar : बोरवणकरांचा बोलविता धनी शरद पवार गटातील नेता ? आमदार मिटकरींचा 'हा' खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com