Amol Mitkari On Borwankar : बोरवणकरांचा बोलविता धनी शरद पवार गटातील नेता ? आमदार मिटकरींचा 'हा' खळबळजनक दावा

Meera Borwankar Allegations Against Ajit Pawar : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Meera Borwankar Allegations Against Ajit Pawar
Meera Borwankar Allegations Against Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Akola News : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' पुस्तकातून हे आरोप केले आहेत. दरम्यान, अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या आमदार अमोल मिटकरी यांनी बोरवणकर यांचा बोलविता धनी हा आमच्यातीलच पण आमच्या गटात नसलेला दुसऱ्या गटातील नेता असल्याचं म्हटलं आहे. केवळ 'भंगार' पुस्तकाची विक्री व्हावी यासाठी हे आरोप करण्यात आल्याचे मिटकरी म्हणाले.

विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी त्यांच्या पुस्तकातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवरील केलेल्या आरोपांवर भाष्य केले आहे. मिटकरी यांनी सोमवारी अकोला येथे मीडियाशी संवाद साधला. त्यांच्या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे, तर बोरवणकर यांच्या बुधवारी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे.

Meera Borwankar Allegations Against Ajit Pawar
Meera Borwankar News : माजी पोलिस आयुक्तांच्या आरोपामुळे ‘दादा’ अडचणीत

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार(Ajit Pawar) गट सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी तथा पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री 'दादा' यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप 'मॅडम कमिशनर' या पुस्तकामध्ये केला आहे.

मीरा बोरवणकर यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्यावेळी पालकमंत्री यांनी माझं ऐकलं नाही. आणि तीन एकर जागा ही खासगी बिल्डरला देण्यात आल्याचे म्हटलं आहे. त्या जागेवर पोलिस कार्यालय उभारले जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.आता याच आरोपावरून मीरा बोरवणकर यांच्या पुस्तक प्रकाशनपूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत मीरा बोरवणकर(Meera Borwankar) यांचा बोलविता धनी हा आमच्यातीलच असून, आमच्या गटातील नसून दुसऱ्या गटातील असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच शरद पवार गटातील असल्याचं म्हटलं आहे.

मीरा बोरवणकरांचे आरोप बिनबुडाचे असून, बोरवणकरांनी केलेल्या आरोपाचे त्यांनी पुरावे द्यावेत. नाहीतर त्यांनी कायदेशीर कारवाईला समोर जावे. त्यांनी आपलं 'भंगार' पुस्तक विक्री व्हावे, यासाठी असे बिनबुडाचे आरोप केल्याचे मिटकरी म्हणाले. आणि याचा बोलविता धनी कोण? असे म्हणत ज्याला आमच्याकडे यायचं होतं. परंतु दुसऱ्या गटातील असा हा नेता आहे. हा आरोप आमच्या व्यक्तीच्याच सांगण्यावरून करण्यात आल्याचे मिटकरी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या भाषणात जरांगे यांनी म्हटलं की, दोन उपमुख्यमंत्र्यांनी दोन माणसे सोडली एक सदावर्ते आणि भुजबळ म्हणजेच त्यांचा रोष हा अजितदादांवर पण होता. त्यामुळे यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं हे तपासले पाहिजे, असेही मिटकरी म्हणाले.

Meera Borwankar Allegations Against Ajit Pawar
Gopichand Padalkar News : 'महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती भांडणं लावणारा लांडगा कोण'; पडळकरांची पवारांवर टीका

मीरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाही आणि पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाहीं म्हणून केवळ प्रसिद्धीसाठी सोयीचे बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टीका करून पुस्तकाचा खप वाढवणे, मीराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल, असेही मिटकरी म्हणाले. मिटकरी यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले असून, राजकारण तापण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Meera Borwankar Allegations Against Ajit Pawar
Mangalwedha News : मंगळवेढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी वेबसाइटचा 'खोडा'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com