Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Video Devendra Fadnavis : कधी नव्हे ते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले; 'खुमखुमी असेल तर...'

Mahayuti Melava in Mumbai : लोकसभेत आपला तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला आहे. ते खोटे बोलत होते, मात्र आपण गाफील राहिलो.
Published on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा निकाल आला अन् महायुतीत कलगीतुरा रंगला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या. घटक पक्षांतील अनेक नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून झालेल्या अवस्थेस जबाबदार असल्याची टीका केली गेली.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस चांगलेच भडकले. त्यांनी महायुतीतील वाचाळवीरांना उद्देशून कडक भाषेत सुनावले आहे.

मुंबईतील षणमुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय महायुतीच्या नेत्यांचेही कान टोचले. यावेळी फडणवीसांनी Devendra Fadnavis लोकसभा निवडणुकीत विसंवाद असल्याची कबुलीच दिली.

ते म्हणाले, सर्वपक्षीयांना सांगतो, की आपल्या एकमेकांमध्ये विसंवाद आहे. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. त्यातूनही खुमखुमी असेल तर आपल्या नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा, अशा शब्दांत वाचाळवीर प्रवक्त्यांना फडणवीसांनी ठणकावले आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राजकीय फडात T-20 वारं; ठाकरेंचा नेता म्हणतो, राज्यात 'त्रिफळा' उडवणारच!

दरम्यान, फडणवीसांनी राज्यात खोटे बोलून महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्याचा दावा केला. लोकसभेत आपला तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला आहे. ते खोटे बोलत होते, मात्र आपण गाफील राहिलो. फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशीही आता आपल्याला लढावे लागणार आहे. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते, दुसरी नाही. विरोधकांना खोटे बोलायची चटक लागली, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

याच मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनीही महायुतीतील नेत्यांना सावध बोलण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, बोलताना जपून बोला. कुठेही काही वेडंवाकडं घडलं तर ते महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले, असे होता कामा नये. त्याची सर्वत्र चर्चा होते. त्यामुळे आपलीच बदनामी होते, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राज्यात तीन नाही तर चार विरोधक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं चौथ्याचे नाव...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com