NCP MLA Disqualification: 'काव्य'युद्ध!खासदार अमोल कोल्हे अन् आमदार अमोल मिटकरींमध्ये जुंपली

Amol Mitkari Vs Amol Kolhe : खासदाराने विचारला प्रश्न; आमदार म्हणाले...
Amol Kolhe & Amol Mitkari.
Amol Kolhe & Amol Mitkari.Sarkarnama

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या ‘काका, का...’या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना भलीमोठी कविताच म्हणून दाखवली. काटेवाडी पासून ते कारगिलपर्यंत महाराष्ट्रासमोर दिल्लीला झुकवायला काकाच हवा असतो, असे अमोल कोल्हे यांनी आपल्या कवितेतून म्हटले. आता यावर अजित पवार यांचे कट्टर समर्थक अकोल्याचे आमदार अमोल मिटकरींनीही कवितेतूनच खासदार कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आता ‘पापा पा..’ सारखे ‘काका.. का..’असे करावे लागणार, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला टोला लगावला होता. त्याला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशास तसे उत्तर दिले आहे. कुणीतरी म्हणाले काका का? जनता म्हणाली काकाचे का? असा खोचक सवाल करीत कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर कवितेतून टीका केली आहे. याच कवितेतून अमोल कोल्हे म्हणाले, पण महाराष्ट्राला पक्के ठाऊक आहे काकाच का? त्यांनी कवितेतून जोरदार अजित पवारंना प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kolhe & Amol Mitkari.
NCP : अमोल मिटकरी बाळापुरातून निवडून आणणार उमेदवार, पण नेमके कुणाला?

कोल्हे यांच्या कवितेवर बोलताना अजित पवार यांचे कट्टर समर्थक अकोल्याचे आमदार अमोल मिटकरींनी यांनीही कोल्हेंना कवितेतूनच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी म्हणाले, ‘का’ प्रश्न विचारताच एकदम चिडले.. शिरूरचे खासदार दादाशी भिडले. अशा शब्दांत त्यांनी खासदार कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले. अमोल मिटकरींनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर कविता करत कवितेतून जोरदार फटकेबाजी केली आहे.

‘का’ प्रश्न विचारताच एकदम चिडले..

शिरूरचे खासदार दादाशी भिडले.

याच दादांनी ज्यांना दाखविली दिल्ली..

दादांनी बोलताच चिडतात हल्ली

पाठीशी उभे होते हेच अजित दादा..

शिरूर मधील जनतेच्या विकासाचा वादा..

दमानं घ्या जरा अधाशी खाऊ नका..

कोल्हेच रहा आव्हाड होऊ नका..

निकालाचे केले स्वागत

आमदार अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. आमदार मिटकरी म्हणाले, अजितदादा यांनी मिळविलेला विजय अनेकांचे पितांबर पिवळे करणारा ठरला आहे. लोकशाही जिवंत आहे, हे पुरोगाम्याला व बालमित्रमंडळाच्या अध्यक्षाला कुणी सांगा रे असा टोलाही मिटकरींनी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

#Shorts |अमोल मिटकरी यांचा वारीतला खास लूक | Amol Mitkari | Wari | Maharashtra | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com