NCP : अमोल मिटकरी बाळापुरातून निवडून आणणार उमेदवार, पण नेमके कुणाला?

Krishna Andhare & Sandip Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पदाधिकारी मैदानात
Amol Mitkari in NCP Meeting
Amol Mitkari in NCP MeetingSarkarnama
Published on
Updated on

Balapur Assembly Election : शिवसेनेतून संदीप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर पक्षातील गटबाजी अकोल्यात पुन्हा एकदा उफाळून आली. पक्षात दाखल होताच पाटील यांनी बैठकीचे आयोजन केल्याने जिल्हाध्यक्ष अंधारे यांनी बैठकीवर आक्षेप घेतला. मात्र संदीप पाटील यांनीही प्रत्युत्तर देत अखेर बैठक घेतली.

संदीप पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादीची दावेदारी दाखवत आमदार अमोल मिटकरींनी संदीप पाटील यांनाच उमेदवारी देऊन आमदार करू असे विधान केले. त्यामुळे आधीच मैदानात असलेल्या जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांना मिटकरींनी ‘चॅलेंज’च करून टाकले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील वाद आणखी तीव्र शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Amol Mitkari in NCP Meeting
Mahayuti Melava : पतंग कापण्याचा प्रयत्न, पण अमोल मिटकरी म्हणाले थांबा ना बाप्पा!

शिवसेना शिंदे गटाला सोडत संदीप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात घरवापसी केली. संदीप पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षात वारंवार गटबाजी उफाळून येऊ लागली आहे. वर्चस्वाच्या लढाईतून आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यातील गटबाजी वारंवार डोके वर काढत आहे. संदीप पाटील यांनी बाळापुरात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अंधारे यांनी पत्र पाठवून विरोध दर्शविला. पाटील यांनीही अंधारेंना प्रत्युत्तर देत बैठक होणारच म्हणत बैठक घेऊन दाखविली.

आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला आमदार अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत मिटकरी म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे एक-एक आमदाराचा विजय महत्त्वाचा आहे. अजित पवार यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे. त्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप पाटील यांच्या रूपाने तरुण चेहरा विधानसभेत पाठवायचा आहे. असे मिटकरी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे या मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे हे देखील तयारी करीत आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यास आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे बोलले जाते. मात्र आमदार अमोल मिटकरी यांनी संदीप पाटील यांची दावेदारी जाहीर करीत पुन्हा अंधारे यांना डिवचले आहे. त्यामुळे अंधारे यांचा मिटकरींनी राजकीय गेम केल्याची चर्चा पुन्हा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी काळात या दोघांच्या वादाची ठिणगी मोठी आग लावण्याची शक्यता आहे.

जिल्हाध्यक्षांनी बैठकीला विरोध करूनही बैठकही घेण्यात आली. त्यात आता संदीप पाटील यांची मतदारसंघावरील दावेदारीही घोषित केली. त्यामुळे आमदार विरुद्ध जिल्हाध्यक्ष यांच्यातील सामना मात्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षात पुढे आणखी काय काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Amol Mitkari in NCP Meeting
NCP Politics : अकोल्यात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘लेटरबॉम्ब वॉर’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com