Amravati APMC Analysis: सहकार मंत्रालयाचा दबाव टाकूनही भाजपला मिळाली एकच बाजार समिती, जिल्ह्यात कॉंग्रेसच !

Amravati Bazar Samiti Election: प्रहार व अपक्ष पॅनल घेऊन उतरलेल्या एका सहकार नेत्याला आपला परंपरागत गढ राखता आला.
Amaravati APMC
Amaravati APMCSarkarnama
Published on
Updated on

Amravati District APMC Election Results Analysis: सहकार क्षेत्रात काँग्रेसचा दबदबा कायम असल्याचे चित्र जिल्हतील १२ बाजार समितीच्या निवडणुकीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. केंद्र व राज्यात सत्ता असताना व सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर केल्यानंतरही भाजपला जिल्ह्यात केवळ एका बाजार समितीवर विजय मिळवता आला, तो ही काँग्रेसच्या असंतूष्टांच्या मदतीने. तर, प्रहार व अपक्ष पॅनल घेऊन उतरलेल्या एका सहकार नेत्याला आपला परंपरागत गढ राखता आला. (Congress' dominance in the cooperative sector remains)

जिल्ह्यात राज्यसभेचे खासदार, अपक्ष खासदाराचे समर्थन, एक आमदार व विधान परिषद सदस्य असलेल्या भाजपला जिल्ह्यात सहकाराची मोट बांधता आली नाही. १२ही बाजार समितीत त्यांनी स्थानिक नेत्यांना हाताशी धरून पॅनल लढविले. मात्र वरूड वगळता इतर ११ ठीकाणी मात खावी लागली. २१६ सदस्यांपैकी २५ सदस्य निवडून आले. हा पराभव भाजपला जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांचा कौल दर्शविणारा असतानाच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अमरावती बाजार समितीची निवडणूक आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यांना माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोर माती खावी लागली. एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे सभापतीपदाचा चेहरा समोर केलेले आमदार बंधू पराभूत झाले. अमरावती व तिवसा यशोमती ठाकूर यांनी एकहाती जिंकत वर्चस्व दाखवून दिले. अचलपूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, दर्यापूर व अंजनगावसुर्जी मध्ये आमदार बळवंत वानखडे, चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे या बाजार समितींवर माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी झेंडे फडकवत गढ राखण्यात यश मिळवले.

डॉ. अनिल बोंडे यानी वरूड जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न केला आहे. मोर्शी बाजार समितीवर आमदार देवेंद्र भुयार यांना माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यामुळे इभ्रत वाचिवता आली. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परंपरागत चांदूर बाजार जिंकत गढ राखला असला तरी त्यांना अचलपूमध्ये हारी खावी लागली. सहकार नेते अभिजीत ढेपे यानी त्यांचा वडीलोपार्जीत नांदगाव खंडेश्वरचा गढ राखण्यात यश मिळवले. धारणी बाजार समितीत बहूपक्षीय पॅनलने यश मिळवले असून आमदार राजकुमार पटेल यांना त्याचे यश आहे.

Amaravati APMC
Wardha District APMC Analysis : वर्धा जिल्यात बाजार समिती भाजपच्या आवाक्यापासून दूरच !

काँग्रेसला (Congress) या निवडणुकीत (APMC Election) घवघवीत यश मिळाले असेच वर्णन करता येणार आहे. १२पैकी तब्बल आठ बाजार समितीत १३३ संचालक मिळाले आहेत. आठही समितींवर त्यांचे सभापती राहणार आहेत. भाजपने (BJP) यावेळी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जरूर, मात्र नेतृत्वाचा अभाव व सहकार क्षेत्रातील राजकीय अननुभव यामुळे त्यांचा सपेशल पराभव झाला.

Amaravati APMC
Chandrapur APMC Analysis : चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसची कामगिरी चांगली, पण कुठे-कुठे सभापतिपदासाठी रस्सीखेच !

खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी एक बाजार समिती जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्ह्यात भाजपकडे सहकारात दमदार नेता नाही, हे स्पष्ट होण्यासोबतच ग्रामीण भागातील मतदाराचा भाजपकडे कल नाही, हे सुद्दा स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने जिकलेल्या बाजार समिती : अमरावती, तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अंजनगावसुर्जी, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी

प्रहार : चांदूर बाजार, भाजप : वरूड, अपक्ष : नांदगाव खंडेश्वर, बहूपक्षीय : धारणी

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com