Bachchu Kadu : महिन्याभरात एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मग योग्य वेळ कधी? कर्जमाफीसाठीचा टायमिंग बच्चू कडूंनी सांगितला

Amravati Bachchu Kadu Slams Mahayuti Govt Over Inaction on Farm Loan Waiver : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीचा निर्णय न घेणाऱ्या राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
Bachchu Kadu 4
Bachchu Kadu 4Sarkarnama
Published on
Updated on

Amravati politics : शेतकरी कर्जमाफीवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

"एका महिन्यात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग आता योग्य वेळ कधी येईल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, योग्य वेळी करू. पण आता हीच वेळ आहे. येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही कर्जमाफी केली पाहिजे ", असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटले की, "आमच्या मागण्या पुढे सरकार झुकलं आहे. आधी अजित पवार म्हणत होते की, आम्ही कर्जमाफीचं कधी म्हटलं नव्हतं, पण आता ते कर्ज माफीसाठी बोलत आहे. हे आमचं यश आहे". फडणवीस म्हणत आहे की, योग्य वेळ आली की कर्जमाफी करू. पण आता हीच योग्य वेळ आहे. येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही कर्जमाफी केली पाहिजे, ही ती योग्य वेळ आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्यापासून मुक्त व्हावं यासाठी पदयात्रा काढतो आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार सोडून लढण्याचा विचार करावा. 2 ऑक्टोबरचं आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी 'सातबारा कोरा कोरा कोरा', ही पदयात्रा काढणार आहे. गांधी विचाराच्या माध्यमातूनच ही पदयात्रा काढली जाणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पापड गावातून ही पदयात्रा 5 जुलैपासून काढणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

Bachchu Kadu 4
Mallikarjun Kharge On PM Modi : मोदी विरोधी पक्षांना तुच्छ लेखतात; मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 'पंतप्रधान बिहार निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र'

पहिल्या शेतकरी आत्महत्या केलेल्या गावात ही पदयात्रा जाईल. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद, संवेदना नसलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न असेल. कर्जमाफी सह इतर मुद्दे याबाबत सरकारला विसर पडू नये, यासाठी ही पदयात्रा असेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Bachchu Kadu 4
Talathi and student death case : तलाठी अन् युवतीचा मृतदेह आढळला; चिठ्ठीत बरचं काही लिहून ठेवलं, नेमकं काय घडलं?

मोदी अन् फडणवीसांना राखी बांधणार

5 ते 9 ऑगस्ट दरम्यान 'सिंदूर यात्रा' देखील काढण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना घेऊन रामायणचे, संविधानाचे, रामटेक से दीक्षाभूमी तक, अशी ही एक यात्रा काढली जाईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा दिवस आहे. या दिवशी सरकारचा कोणी प्रतिनिधी आम्हाला भेटला, तर त्याच्या हाताला राखी बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला देखील राखी बांधणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

बहि‍णींची कुंकू सांभाळण्याची जबाबदारी सरकारची

साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आता लाडक्या बहिणींचा कुंकू पुसलं जाणार नाही, याची जबाबदारी सरकारने घ्यावी. महिन्याला एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार? असा बच्चू कडू यांनी पुन्हा सवाल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com