Anil Bonde On Rahul Gandhi : 'राहुल गांधींना 'सर्वोच्च' चटका, मला जो अपेक्षित होता'; खासदार बोंडेंनी जुना हिशोब काढला

Anil Bonde Reacts After Supreme Court Raps Rahul Gandhi Over Savarkar Remark : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बेजबाबदार टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने बोल सुनावल्यावर अमरावती भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Anil Bonde On Rahul Gandhi
Anil Bonde On Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Savarkar controversy : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका रॅलीदरम्यान, स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याविषयी बेजबाबदारी टिप्पणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावरून राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले आहेत.

महात्मा गांधीपासून ते इंदिरा गांधीपर्यंत सावरकर यांच्याविषयी केलेल्या सुस्तीचे स्मरण सर्वोच्च न्यायालयाने यावेळी करून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर राहुल गांधींना सत्ताधारी भाजपमधील खासदार देखील सुनावू लागले आहेत.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टिप्पणीवर त्यावेळी भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी वाद ओढावून घेणारे विधान केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत, असे खासदार बोंडे यांनी म्हटले होते. यावरून खासदार बोंडेंविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत, फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

Anil Bonde On Rahul Gandhi
Krishnaswamy Kasturirangan : इस्त्रो माजी प्रमुख, पद्मश्री, पद्मभूषण अन् पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित कृष्णस्वामी कस्तुरीरंगन...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे उपाध्यक्ष हरिश ऊर्फ भैया मुरलीधर पवार यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. युवक काँग्रेसने बोंडे यांच्या राजापेठ घरासमोर निदर्शने केली होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील टिप्पणी बेजबाबदार, असल्याचे म्हणत राहुल गांधींना फटकारले. यावर आता पुन्हा खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

Anil Bonde On Rahul Gandhi
Sunil Tatkare : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफी मिळणार? तटकरेंनी दिले संकेत; म्हणाले, 'आमचा यू टर्न...'

खासदार अनिल बोंडे म्हणाले, "राहुल गांधी चुकीचेच बोलले होते. वाह्यात बोलले होते. मी त्यावेळी सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यावे, असे म्हटल होते. सोनिया गांधी यांनी ते काम केले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी 14 वर्षे काळ कोठडीत घातले. हाल सहन केले. स्वातंत्र्याच्या लढात स्वातंत्र्यवीरांचं मोठं योगदान होतं. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले. मी तर म्हणेल, सर्वोच्च न्यायालयाने चटका दिला. जो मला अपेक्षित होता".

चटका बसल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांचे चमचे, नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकरू त्यांनाही तोंड फुटते. तेही स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलायला लागतात. या सगळ्यांनी ती चपराक आहे, चटके आहेत, असेही अनिल बोंडे यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारल्यानंतर त्यावर खासदार बोंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे, जुना हिशोब चुकता करणारी आहे, असे म्हटले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com