Amravati BJP News : अमरावतीत आजपासून भाजपची ‘मेरी माटी मेरा देश’ अमृत कलश यात्रा सुरू…

Narendra Modi : तीन हजार ६०० किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे.
Anil Bonde and Others
Anil Bonde and OthersSarkarnama
Published on
Updated on

Amravati District BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आखण्यात आलेली भारतीय जनता पक्षाची ‘मेरी माटी मेरा देश’ ही अमृत कलश यात्रा पश्‍चिम विदर्भातील अमरावतीमध्ये सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील ३६० गावे, सहा विधानसभा मतदारसंघ असा तीन हजार ६०० किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. (This journey will cover a distance of 3,600 kilometers)

या यात्रेचा शुभारंभ आज (ता. ६) इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाला. यात्रेत सहभागी असलेल्या सहा आकर्षक सजावट केलेल्या रथांना भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी झेंडा दाखवला. सहा विधानसभा क्षेत्रांतील गावांमध्ये ही अमृत कलश यात्रा जाणार आहे.

प्रत्येक गावातील माती रथांमधील अमृतकलशामध्ये टाकली जाणार आहे. सहाही विधानसभा क्षेत्रातून रथांमध्ये जमा केलेली माती दिल्लीच्या (Delhi) अमृत उद्यानामध्ये नेली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ही यात्रा अमरावती (Amravati) जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, प्रेरणास्थळे, शहीद स्मारक, महापुरुषांची जन्मगावे इत्यादी ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी वीरांना वंदन करणार आहे.

यात्रेला झेंडा दाखवल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले, २०४७ सालापर्यंत भारत देश आत्मनिर्भर करण्याकरिता मोदींच्या संकल्पनेनुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अमरावती जिल्ह्यात राबविले जात आहे. शहिदांना वंदन करून अमरावती जिल्ह्यात सहा रथ ३६० गावांमध्ये ११ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये, ३६६० किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

Anil Bonde and Others
Amravati Double Murder Case : कोल्डब्लडेड डबल मर्डर, थक्क करणारी हिस्ट्री; पोलिसांनी उलगडले रहस्य !

या माध्यमातून ३६० गावांतील प्रत्येक घरापर्यंत ही यात्रा पोहोचणार आहे. त्या त्या गावांतील लोक तेथील माती अमृत कलशामध्ये टाकणार आहेत. या गावांतील प्रत्येक माणसाचा सहभाग या यात्रेमध्ये राहणार आहे. या अभियानाची सुरुवात करण्यासाठी या यात्रेचे महाराष्ट्र संयोजक राजेश पांडे विशेष करून अमरावतीमध्ये आल्याचेही डॉ. बोंडे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com