
अमरावती : विदर्भातील (Vidarbh) सर्वांत मोठ्या आर्थिक उलाढालीची अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Amravati District Central Co-operative Bank) निवडणूक आज होत आहे. आज १७ संचालक पदासाठी सकाळी ८ वाजता पासून मतदानाला सुरवात झाली. या निवडणुकीत प्रथमच राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) सह तीन विद्यमान आमदार निवडून रिंगणात असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून अमरावती जिल्ह्यासह राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहेत.
तसेच या निवडणुकीत काँग्रेस नेत्या व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच वेगळे वेगळे पॅनल असल्याने बच्चू कडू व यशोमती ठाकूर या दोन महाविकास आघाडी मधील मंत्र्याचे भवितव्य पणाला लागले आहे. १६८७ मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, 17 जागेसाठी 48 उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे आज सकाळ पासून मतदान केंद्रावर निवडणूकीचा उत्साह दिसुन आला आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालणार असून उद्या मतमोजणी होणार आहे,मंत्री यशोमती ठाकूर ह्या सकाळी 10 वाजता तिवसा येथे आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे.
दरम्यान, अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांसह अन्य राजकीय आणि सहकारातील बड्या लोक या पॅनलमध्ये प्रत्यक्ष उमेदवार आहेत.
तर त्यांच्याविरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल आहे. राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवार आहेत. तर भाजपचे, माजी मंत्री भैय्यासाहेब देशमुख आणि आमदार प्रताप अडसड पॅनलचं काम पाहत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.