Amravati Fadanvis News : आम्ही तर आता पाकिस्तानात जाऊनही हनुमान चालिसा म्हणू..!

Uddhav Thackeray : फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लक्ष्य केले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Amravati District Political News : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मागील सरकारने १२ दिवस जेलमध्ये टाकले. काय तर हनुमान चालिसा म्हटली म्हणून. दोघांनाही जेलमध्ये राहावं लागलं. हनुमान चालिसा या देशात म्हणायची नाही, तर मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का, असा सवाल फडणवीस यांनी केला. (Fadnavis targeted Uddhav Thackeray without naming him)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्यातर्फे अमरावती शहरात आज (ता. १०) दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, तो दिवस दूर नाही की, पाकिस्तानात जाऊनही आम्ही हनुमान चालिसा म्हणून दाखवू. कारण नरेंद्र मोदींच्या राज्यात पाकिस्तानात जाऊनही हनुमान चालिसा म्हणणे शक्य आहे.

आपल्याच देशात हे कोण लोक आहेत की, जे हनुमान चालिसा म्हटल्यानंतर जेलमध्ये टाकतात, असा सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाव न घेता लक्ष्य केले. हनुमान चालिसा म्हटल्यावर जे लोकांना जेलमध्ये टाकतात त्यांना यापुढेही घरीच बसवा, असे आवाहन फडणवीसांनी (Devendra Fadanvis) जनतेला केले.

श्रीकृष्ण अमरावतीचे जावई...

आपण इंडिया माता की जय म्हणत नाही, तर भारत माता की जय म्हणतो आणि भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आज ही दहीहंडी फोडून त्यातील काला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे, जसे मोदी प्रत्येक योजनांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत लाभ पोहोचवत आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया’ आघाडीवर टीका केली. दहीहंडीतील काला हा श्रीकृष्णाचा आहे आणि श्रीकृष्णाचे या जिल्ह्याशी जवळचे नाते आहे. श्रीकृष्ण या जिल्ह्याचे जावई आहेत. त्यामुळे हा काला प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण निश्‍चितपणे करू, असेही ते म्हणाले.

Devendra Fadanvis
Fadanvis On 'INDIA' : समन्वयकही ठरला नाही, अन् पाच नेत्यांचा पंतप्रधान पदावर दावा; फडणवीसांनी घेतला 'इंडिया'चा समाचार !

स्टॅलिनचाही घेतला समाचार...

या देशात भगवान राम, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव चालेल. आपल्या सरकारमध्ये यावर कुणीही बंदी आणू शकणार नाही, असे सांगत त्यांनी स्टॅलिनचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, परवा उद्धव ठाकरे त्या ज्युनिअर स्टॅलिनच्या बाजूला बसले होते, तो स्टॅलिन म्हणतो की, हिंदू धर्म कोविडसारखा आहे, या धर्माचे समूळ नष्ट करून टाका. पण हिंदू धर्म नष्ट करण्याची ताकद कुणाच्या बापात नाही.

या देशावर ज्यांनी आक्रमण केले, ते संपले. पण हिंदू धर्म कधी संपला नाही. स्टॅलिन जर हिंदू धर्म संपवण्याच्या गोष्टी करत असेल, तर ते कदापि होणे शक्य नाही. कारण या देशातील प्रत्येक हिंदू आपल्या धर्माचा झेंडा जगात घेऊन फिरणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com