Amravati Gavathi Bomb News : २८ गावठी बॉंम्बसह दोघांना अटक, जंगली डुकरांच्या शिकारीसाठी वापरत होते बॉम्ब !

Wild boar hunting : वडगाव फत्तेपूर शेत शिवारात सदरच्या जंगली डुकराची शिकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
village Bomb
village BombSarkarnama

Amravati District Paratwada Crime News : दोन इसम एका मोटरसायकलवर जंगली डुकराची शिकार करून घेऊन येत आहेत व त्यांच्याजवळ गावठी बॉम्ब आहेत, अशी माहिती परतवाडा पोलिसांना काल (ता. ३०) रात्री मिळाली. त्यानुसार अंजनगाव थांब्यावर नाकाबंदी करण्यात आली. (Anjangaon stop was blocked by Police)

एका मोटरसायकलवर चानसिंग कनेरसिंग बावरी (वय ५० वर्ष) आणि अशोक सावळाराम शिंदे (वय ४५) दोघेही राहणार लालपुल परतवाडा, हे मृत डुक्कर घेऊन येताना सापडले. त्यांच्याजवळ एक मरण पावलेला जंगली डुक्कर व एका पिशवीत २८ गावठी बॉम्ब सापडले.

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव फत्तेपूर शेत शिवारात सदरच्या जंगली डुकराची शिकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गावठी बॉम्ब सदृश वस्तूची बीडीडीएस पथकाकडून तपासणी केली असता सदर गोळे विस्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक कलम २८६ भादंवि सहकलम तीन (अ ), पाच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ व कलम नऊ, ३९ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ तसेच कलम तीन, पाच, २५, २७ शस्त्र अधिनियम अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

village Bomb
Amravati Loksabha : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाही चालणार बाहेरचा उमेदवार, निरीक्षकांना स्पष्टच सांगितले !

आरोपींना न्यायालयात केले हजर..

आज (ता. ३१) सकाळी पोलिसांनी (Police) अटक केलेल्या चानसिंग कनेरसिंग बावरी (वय 50 वर्ष) आणि अशोक सावळाराम शिंदे या दोन्ही आरोपींना न्यायालयात (Court) नेण्यात आले आहे. तेथे त्यांची पोलिस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती आहे.

डुक्कर पकडण्यासाठी वापरले जातात गावठी बॉम्ब..

जंगली डुक्कर शक्तीखाली असतात. जाळं टाकून किंवा काठ्यांनी मारून ते पकडता येत नाही. त्यामुळे गावठी बॉम्बच्या साहाय्याने डुकराची शिकार केली जाते. शिकारी गावठी बॉम्ब डुकराला मारून फेकतात. बॉम्ब लागताच त्याचा स्फोट होतो. त्यामध्ये डुक्कर जखमी होते. त्यानंतर शिकारी त्याला पकडतात.

village Bomb
Vijay Wadettiwar In Amravati : आरोग्यमंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का ? वडेट्टीवारांचा संताप, काय आहे कारण ?

इतरत्र फुटल्यास होऊ शकते जीवित हानी..

जंगली डुकरांची शिकार करणारे लोक नेहमी गावठी बॉम्ब सोबत ठेवतात. त्यांच्या घरीसुद्धा ठेवतात. अनवधानाने एखादवेळी मानवी वस्तीत त्याचा स्फोट झाल्यास जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

घरात लहान मुलांच्या हाती लागल्यास मोठी दुर्घटना होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एखाद वेळी बॉम्बची पिशवी पडून मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अशा शिकाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com