Sharad Pawar News : पवारांनी मागितली अमरावतीकरांची माफी; पाच वर्षांपूर्वीची चूक आता होणार नाही...!

Is there a new Putin in the form of Narendra Modi in the country? : देशात नरेंद्र मोदींच्या रूपाने नवीन पुतीन तयार होत आहे का ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..
Navneet Rana - Sharad Pawar
Navneet Rana - Sharad PawarSarkarnama

Amravati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झाला असून, दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे केंद्रामधील अनेक नेते प्रचारात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेते खिंड लढवित आहेत. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचाराचा हा धुरळा असाच सुरू राहणार आहे.

अमरावती (Amravati) येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाकरिता ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज जाहीर सभा झाली. या सभेत पवार यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. पाच वर्षांपूर्वी निवडणुकीमध्ये मी राणा यांना मतदान करा, अशा सभा घेतल्या आणि पाठिंबा दिला. त्यांना खासदार केलं. मात्र, त्यानंतर जे झालं. तेव्हापासून मी अस्वस्थ होतो. मला खूप वेळा वाटलं की अमरावतीमध्ये जावे आणि अमरावतीकरांची माफी मागावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana - Sharad Pawar
Chhatrapati Sambhajinagar News : खैरेंनी वाजतगाजत, तर भुमरेंनी गुपचूप अर्ज भरला..!

पाच वर्षांपूर्वी झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आलो आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यांना मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar ) यांनी केले होते. खासदार झाल्यानंतर मात्र राणा यांनी आपली भूमिका बदलत भाजपच्या बाजूने बोलणे सुरू केले. या निवडणुकीत भाजपने त्यांना अमरावतीमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

संसदेमध्ये (LOK SABHA) जेव्हा नरेंद्र मोदी जातात तेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात, एक प्रकारची दहशत त्या ठिकाणी दिसून येते. या देशात मोदींच्या रूपाने नवीन पुतीन तयार होत आहे का ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे पवार म्हणाले. उत्तर प्रदेश मध्ये खासदार जाहीर बोलतात की, संविधान बदलायचे असेल तर मोदींना मतदान करा. सध्या जी हुकूमशाही आली आहे. त्याला घालवण्यासाठी संविधान मजबूत केलं पाहिजे. नरेंद्र मोदींना देशाचे संविधान बदलायचे आहे. त्यांना यापासून रोखायचे असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखविली पाहिजे, अशा शब्दांत पवार यांनी मोदींवर टीका केली.

R.

Navneet Rana - Sharad Pawar
Eknath Shinde News : 'देवेंद्र फडणवीस, आशिष शेलारांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com