Chhatrapati Sambhajinagar News : खैरेंनी वाजतगाजत, तर भुमरेंनी गुपचूप अर्ज भरला..!

Loksabha Election 2024 : आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार, मंत्री व नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला होता.
Chandrakant Khaire - Sandipan Bhumre
Chandrakant Khaire - Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News : महाविकास आघाडी ठाकरे गटाचे संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सोमवारी (ता.22) वाजतगाजत आणि मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युवानेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढत चंद्रकांत खैरे यांनी सहाव्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केला.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते, तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी शुभ मुहूर्तावर अर्ज दाखल करायचा म्हणून गुपचूप कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज भरला. 25 एप्रिल रोजी ते पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या राज्य व जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत दुसरा अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Chandrakant Khaire - Sandipan Bhumre
Madha Loksabha : माढ्यातून शेकापच्या देशमुखांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी संभाजीनगरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार, मंत्री व नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला होता. त्यानंतर क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे या नेत्यांसोबत मिरवणुकीत सहभागी झाले.

तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पत्नी वैजयंती खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन हे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर क्रांती चौकातून निघालेली मिरवणूक संस्थान गणपती मंदिर येथे पोहाेचली. तिथे महाआरती झाल्यानंतर नेत्याची भाषणे झाली. दुपारी चार वाजता शहागंज येथे आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला, तर खैरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीचे संदीपान भुमरे Sandipan Bhumare यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण भुमरे यांनी केवळ चांगला मुहूर्त हुकू नये, यासाठी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता अर्ज भरला.

या वेळी भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, आमदार संजय शिरसाट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कैलास पाटील उपस्थित होते. भुमरे यांनी आज गुपचूप उमेदवारी दाखल केली असली तरी 25 रोजी मोठे शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Chandrakant Khaire - Sandipan Bhumre
Eknath Shinde News : 'देवेंद्र फडणवीस, आशिष शेलारांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com