

Amravati crime news : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणानंतर त्याचे व्हिडिओ आणि फोटोचे प्रकरण गाजत असतानाच, पुन्हा अशाच प्रकरणाची पुनरावृत्ती समोर आली आहे.
परतवाडा सारखेच कृत्य बेनोडा इथं उघडकीस आलं आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील बाबू हसन बबलू हसन (वय 22, रा. मुरादाबाद) आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील परतवाडासारखेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत त्याचे व्हिडिओ अन् फोटो प्रकरणासारखे बेनोडा इथं उघडकीस आलं आहे. बाबू हसन बबलू हसन या युवकाने अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ अन् फोटो काढून पीडितेच्या आई आणि आजीला पाठवले.
यातील पीडिता आणि आरोपी यांची मागील दोन वर्षांपासून समाज माध्यमांद्वारे (Social Media) ओळख झाली. पुढे मैत्री झाली. याचं दरम्यान पीडिताने स्वतःचे काही फोटो आरोपीला पाठविले होते. त्याच दरम्यान आरोपी हा 5 जानेवारीला उत्तर प्रदेश इथून नागपूर इथं आला.
अल्पवयीन पीडितेला नागपूर इथं भेटायला बोलावून भेट घेण्याची गळ घातली. यानंतर दोघांची भेट झाली. या भेटीत आरोपीने पीडितेच्या इच्छा विरोधात तिच्यावर बळजबरी केली. पीडिताने हा प्रकार पुढे भीतीपोटी कोणालाच सांगितला नाही.
काही दिवसानंतर पीडित व आरोपी यांचे वाद झाल्याने पीडिताने आरोपीचा नंबर ब्लॉक केला. याचा राग आरोपीला आला, अन् त्याने पीडिताचे आक्षेपार्ह अर्धनग्न फोटो हे तिचे आई आणि आजीला व्हॉटस्अॅपवर पाठवले.
तसेच, हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकाराने पीडितेचे आई-आजीला चांगलाच धक्का बसला. त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार दिली. पीडितेचा तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी पोक्सो अन्वये गुन्ह्याची नोंद केली. यातील आरोपीला 30 तारखेचा अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.