Rahata Loni harassment : रस्त्यात छेडछाड, जाब विचारताच मुलीवर झडप; व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी आक्रमक

A viral video of a youth harassing a college girl in Rahata-Loni sparked outrage among Hindutva activists, prompting swift police action and registration of a case : राहाता तालुक्यातील लोणी इथं भर रस्त्यात मुलीची छेडछाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Rahata Loni harassment
Rahata Loni harassmentSarkarnama
Published on
Updated on

Rahata Loni harassment case : भर रस्त्यात मुलीशी वाद घालत, तिच्या अंगावर झेप घेणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

पीडित युवतीला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मदत केल्यानंतर तिच्या तक्रारीवरून राहाता तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील लोणी (ता. राहाता) इथं रस्त्यावर युवक आणि युवतीमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेत युवतीला लज्जा उत्पन्न होईल, असे इशारे केल्याचा आरोप समोर आहे. पीडित युवतीने धाडस दाखवत संबंधित युवकाला जाब विचारला, “तू अश्लील हातवारे का केले? शिवी का दिली? असा सवाल केला.

पीडितेने जाब विचारल्यावर, दुचाकीवर बसलेल्या युवकाने तिच्याशी हुज्जत घातली. या दोघांमध्ये बराच वेळ वाद (Crime) झाला. या युवकाबरोबर आणि एक युवक तिथं होता. त्याने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. वाद घालणारे युवक-युवती आक्रमक होते. दोन्ही बाजूने मोबाईलमधील व्हिडिओमध्ये चित्रीकरण सुरू होते.

Rahata Loni harassment
Amravati crime : धक्कादायक! 16 वर्षीय मुलीला टक्कल करून मारहाण; आई-वडिलांचा अमानुष कहर उघड

युवती जास्त आक्रमक झाल्यावर, युवकाने तिच्या दिशेने उडी घेतली. तक्रारीनुसार संबंधित तरुणावर छेडछाड आणि मारहाणीचा प्रयत्न करणे, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात अट्रोसिटी कायद्यान्वयेही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, या प्रकरणात आणखी दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

Rahata Loni harassment
Obscene Video Viral Case : अमरावती हादरली! मुस्लिम युवकांकडून 180 युवतींचं लैगिंक शोषण, 350 व्हिडिओ व्हायरल, भाजप खासदाराची थेट अधीक्षकांकडे तक्रार

दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला धीर देत गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केली. तसेच काही गुंड प्रवृत्तीचे युवक शाळा आणि महाविद्यालयीन मुलींना त्रास देतात, छेडछाड करतात, अशा घटनांवर पोलिसांनी लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com