Amravati News : भाजपसमोर आता तीनच पर्याय... 'संजय खोडकेंचा' एक डाव रवी राणा अन् नवनीत राणांना जड जाणार?

BJP Vs NCP New : अमरावती जिल्ह्यात राणा दाम्पत्य विरुद्ध खोडके दाम्पत्य या दोघांमधील वाद सर्वश्रृत आहे. आता महापालिका निवडणुकीतही राणा दाम्पत्याला पुन्हा विरोध करण्याची भूमिका खोडके यांनी घेतली आहे.
Amravati Municipal Corporation | Ajit Pawar | Sanjay Khodke | Ravi Rana
Amravati Municipal Corporation | Ajit Pawar | Sanjay Khodke | Ravi Rana Sarkarnama
Published on
Updated on

BJP Vs NCP New : अमरावती जिल्ह्यात राणा दाम्पत्य विरुद्ध खोडके दाम्पत्य या दोघांमधील वाद सर्वश्रृत आहे. अगदी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना तिकीटच मिळू नये यासाठी प्रयत्न करण्यापासून ते तिकीट मिळाल्यानंतरही त्यांना पराभूत करण्यापर्यंत आमदार संजय खोडके यांनी सगळी ताकद वापरली होती. आता महापालिका निवडणुकीतही राणा दाम्पत्याला पुन्हा विरोध करण्याची भूमिका खोडके यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादीची अमरावती शहर कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजय खोडके बोलत होते. यावेळी आमदार सुलभा खोडकेही उपस्थित होत्या. संजय खोडके म्हणाले, भाजपकडून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची भाषा केली जात आहे. पण आमचा भाजपसोबत युती करण्याला विरोध नाही. मात्र भाजपचा घटक पक्ष युवा स्वाभिमान जर या युतीमध्ये असेल तर आम्ही 200 टक्के स्वबळावर लढू.

युवा स्वाभिमान पक्षाशी आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे युतीच्या नावावर आम्ही त्यांना सहन करणार नाही. त्यापेक्षा आम्ही स्वबळावर महापालिका लढवू आणि आमचाच महापौर बनवू. भाजपशी आमचे वैर नाही. पण ऊठसूठ एका विशेष समाजाला टार्गेट करणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षासोबत आम्ही जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपसमोर आता स्वबळावर जाणे, युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेणे किंवा राष्ट्रवादीची सोबत हवी असल्यास रवी राणा यांना लांब ठेवणे असे तीनच पर्याय आहेत.

Amravati Municipal Corporation | Ajit Pawar | Sanjay Khodke | Ravi Rana
Amravati News : अमरावतीच्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; ठाकूर-बंड यांची सत्ता असलेल्या 'खरेदी-विक्री' संघावर कायमस्वरुपी निर्बंध

अमरावती शहरची जम्बो कार्यकारिणी जाहीर :

आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने आज शहराध्यक्षपदी प्रशांत डवरे यांची फेरनिवड केली. तर नवीन शहर कार्यकारिणीमध्ये 33 उपाध्यक्ष, 57 सचिव, 38 संघटन सचिव, 62 सरचिटणीस आणि 10 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष म्हणून भोजराज काळे, जितेंद्र ठाकूर, रतन डेंडुले, भूषण बनसोड, सपना ठाकूर, मनीष बजाज, , जयश्री मोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. शहर प्रवक्तेपदी अविनाश मार्डीकर, अॅड. किशोर शेळके, प्रा. सनाउल्ला खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com