Anil Bonde Vs Yashomati Thakur : खासदार अनिल बोंडेंविरुद्ध गुन्हा; पोलिस कारवाईसाठी 'अ‍ॅक्शन मोड'वर

A case has been registered against BJP MP Anil Bonde in Amravati : राहुल गांधी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधान करणारे राज्यसभेतील भाजप खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
Anil Bonde Vs Yashomati Thakur 1
Anil Bonde Vs Yashomati Thakur 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधान करणारे राज्यसभेतील भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. अमरावती पोलिस आयुक्तालयात काँग्रेस नेत्यांनी यासाठी ठिय्या आंदोलन केलं.

खासदार बोंडे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात पोलिस काय कारवाई करणार, याकडं आता लक्ष लागलं आहे.

काँग्रेस (Congress) नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील नेते प्रक्षोभक विधानं करत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधान सर्वाधिक चर्चेत आले. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर राज्यसभेतील भाजपचे खासदास अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजे, असं विधान केलं. अशा प्रक्षोभन विधानांवर महाविकास आघाडीसह काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली.

Anil Bonde Vs Yashomati Thakur 1
VIDEO : राहुल गांधींबाबत बोंडेंचं वादग्रस्त विधान अन् फडणवीसांचा उल्लेख करत यशोमती ठाकूर पोलिसांवरच भडकल्या

भाजर खासदार अनिल बोंडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि पदाधिकाऱ्यांनी अमरावती पोलिस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या होत्या. पोलिसांशी यांची शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस आयुक्तालयातून उठणार नाही, असा पवित्रा यशोमती ठाकूर यांनी घेतला होता. यानंतर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Anil Bonde Vs Yashomati Thakur 1
Bhandara Assembly Constituency Politics : भंडारा यावेळी कोणाला पाडणार? 'मविआ' आणि महायुतीत तिकिटासाठी रस्सीखेच

यशोमती ठाकूर संतापल्या

पोलिस आयुक्तालयात पोलिसांशी झालेल्या शाब्दिक वादात, यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या होत्या. "खासदार अनिल बोंडे यांचे संतुलन बिघडले आहे. हा बेअक्कल माणूस असल्यानं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे संतुलन बिघडवणाऱ्यांना आवर घातला पाहिजे", असे यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

अनिल बोंडे यांचे काय होते विधान?

भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले होते की, "राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. त्यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत. राहुल गांधी यांचे आरक्षणाविषयी भयानक विधान होतं. परदेशात जाऊन कोणी काहीही बोलत असेल, तर योग्य नाही. अशावेळी त्यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत. मग राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत किंवा श्याम मानव असोत".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com