VIDEO : राहुल गांधींबाबत बोंडेंचं वादग्रस्त विधान अन् फडणवीसांचा उल्लेख करत यशोमती ठाकूर पोलिसांवरच भडकल्या

Anil Bonde On rahul Gandhi : अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं रान पेटलं आहे. मात्र, अनिल बोंडे यांच्याविरोधात यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत.
yashomati thakur.jpg
yashomati thakur.jpgsarkarnama
Published on
Updated on

खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत,' असं वादग्रस्त विधान खासदार बोंडे यांनी केलं आहे. बोंडे यांच्या विधानानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यानं यशोमती ठाकूर पोलिस अधिकाऱ्यांवर भडकल्या आहेत.

yashomati thakur.jpg
Sanjay Gaikwad : सुधारतील ते आमदार गायकवाड कसले! आधी बेताल वक्तव्य, नंतर माफी मागण्यास नकार; आता पुन्हा धमकी

अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांनी कोणतीही 'अ‍ॅक्शन' न घेतल्यानं यशोमती ठाकूर यांना संताप अनावर झाला.

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यावर संतापत यशोमती ठाकूर म्हणाल्या, "अमरावतीकर तुमच्याबद्दल काय विचार करतात, याचा विचार करा. गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही सोडणार नाही."

"असंच विधान एखाद्या काँग्रेसवाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलं असतं, तर तुम्ही सहन केलं असतं का?" असा सवाल यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यांनी पोलिस आयुक्त रेड्डींना उपस्थित केला आहे. तसेच, "गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही आग लावली आहे," अशी टीकाही ठाकूर यांनी केली आहे.

yashomati thakur.jpg
Ajit Pawar : "अजितदादांनी थांबवलं तरी, भाजपच्या आमदाराविरोधात लढणार", 'NCP'तील नेत्या इरेला पेटल्या

अनिल बोंडे काय म्हणाले?

"संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा केली, ती योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले, तेही भयानक आहे. त्यामुळे परदेशात जाऊन कोणी वात्रटासारखं बोलत असेल, तर जीभ छाटू नये, जीभेला चटके दिले पाहिजेत. त्यात मग राहुल गांधी, ज्ञानेश महाराव किंवा श्याम मानव असो. भारतातील बहुसंख्याकांच्या जे भावना दुखावतात. त्या लोकांना कमीत-कमी जाणीव करून दिली पाहिजेल," असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com