Nagpur Winter Session : खातेवाटपाचा तिढा सुटेना; अन् अधिकाऱ्यांना पडला वेगळाच प्रश्न

Ravi Bhavan Nagpur Winter Session : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाच डिसेंबरला शपथ घेतली. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि खातेवाटप होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, मंत्रिमंडळ जाहीर होत नसल्याने बंगले वाटपही रखडलं आहे.
Nagpur Winter session news
Nagpur Winter session news Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होत नसल्याने नागपूरमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटपही रखडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाच डिसेंबरला शपथ घेतली. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि खातेवाटप होईल असा अंदाज वर्तविला जात होता.

मात्र दहा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीचे काही ठरत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना काही खात्यासाठी अडून बसली असल्याची चर्चा आहे. मुंबईतील विशेष अधिवेशनानंतर 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपूरमध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Nagpur Winter session news
Maharashtra Congress : काँग्रेसमध्ये वाद उफाळला, विधानसभा पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांचीच; वडेट्टीवारांनी डागली तोफ

अधिकारी नागपूरमध्ये मुक्कामाला आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या बंगल्यांची रंगरंगोटी करून ठेवली आहे. आता फक्त बंगल्यांसमोर मंत्र्यांच्या नावच्या पाट्या लावणे शिल्लक राहिले आहेत. काही मंत्र्यांचा विशिष्ट बंगल्यासाठी आग्रह असतो. त्यामुळे वेळेवर अनेक बदलही केले जातात. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी देवगिरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी (Ajit Pawar) विजयगड हा शासकीय बंगला सज्ज करण्यात आला आहे.

रविभवन येथील बंगल्यांमध्ये मंत्र्यांच्या राहण्याची व्यवस्था असते. अधिवेशनासाठी हे सर्व बंगले सज्ज करण्यात आले आहे. परंतु मंत्रीच निश्चित झाले नसल्याने बंगल्यांचा वाटप अडकले आहे. अधिवेशन सुरू व्हायला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही. मंत्र्यांकडे कोणती खाती असेल, हे निश्चित नाही.

Nagpur Winter session news
Delhi Assembly Election : केजरीवाल यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा रिंगणात ; आईच्या पराभवाचा वचपा काढणार ?

त्यामुळे बंगला वाटप समितीची बैठकच झाली नाही. शेवटच्या क्षणी मंत्री निश्चित झाल्यास राजशिष्टाचारनुसार बंगल्यांचे वाटप करण्यासाठी मोठी तारांबळ उडणार असल्याने अधिकाऱ्यांचाही बीपी वाढला आहे. दुसरीकडे मंत्र्यांना विधानभवनातही दालने उपलब्ध करून दिली जातात. दलानाचेही वाटप रखडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com