संघ कार्यालयाला घेरावाचा प्रयत्न फसला; वामन मेश्राम आता लक्ष्मण मानेंच्या मेळाव्यात बोलणार...

वामन मेश्राम यांनी काल नागपुरातील (Nagpur) बेझनबाग येथे सभा आयोजित केली होती. त्यानंतर मोर्चा काढून संघ कार्यालयाला घेराव करण्याचे त्यांचे नियोजन होते.
Lakshman Mane and Waman Meshram at Nagpur
Lakshman Mane and Waman Meshram at NagpurSarkarnama

नागपूर : भारत (India) मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी काल नागपुरातील बेझनबाग येथे सभा आयोजित केली होती. त्यानंतर मोर्चा काढून संघ कार्यालयाला घेराव करण्याचे त्यांचे नियोजन होते. पण उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. तरीही त्यांनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी मेश्राम व त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने प्रयत्न फसला.

वामन मेश्राम (Waman Meshram) यांचा संघ (RSS) कार्यालयाला घेरावाचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूर (Nagpur) येथील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. उद्या शनिवारी विमुक्त-भटक्यांचे राष्ट्रीय आंबेडकरवादी नेते पद्मश्री लक्ष्मण माने (Lakshman Mane) यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या मेळाव्यात वामन मेश्राम काय बोलतील यावरून विविध पुरोगामी चळवळीची पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

`उपरा`कार लक्ष्मण माने पश्चिम महाराष्ट्रात विमुक्त भटक्यांच्या जीवनात परिवर्तनाची पहाट आणण्यासाठी संघर्षरत आहेत. आता त्यांनी आपला मोर्चा विदर्भाकडे वळवला असून येथील वंचितांना न्याय देण्यासाठी मेळाव्याच्या माध्यमातून ते बिगुल फुंकणार आहेत. विशेष म्हणजे या मेळाव्यात अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना या मेळाव्यात `लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा` किताब कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे.

Lakshman Mane and Waman Meshram at Nagpur
RSS ला पराभूत करण्याची ताकद महाराष्ट्रात; शरद पवारांची साथ सोडणार नाही... लक्ष्मण माने

वामन मेश्राम प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून नागपूरचे राजे संग्रामसिंग भोसले उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी ११ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात डॉ. प्रदीप आगलावे करतील. नारायण जावळीकर यांच्या अध्यक्षतेखाली विमुक्त भटके जाती जमातीतील कार्यकर्त्यांची भाषणे होतील. वैदर्भी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर डॉ. प्रकाश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होईल. मुख्य सोहळा सायंकाळी चार वाजता ख्यातनाम साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीच्या भटक्या विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, सुषमा अंधारे, डॉ. अमोल माने असतील. प्रास्ताविक लक्ष्मण माने करतील. या कार्यक्रमात दिग्गज काय बोलतील याची उत्सुकता आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशांत वंजारे, दीपक साने, प्रदीप गायकवाड, डॉ. वासुदेव डहाके, प्रवीण कुंटे, सुदाम राठोड आदी प्रयत्न करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com