
मुंबई : दलितांना एकत्रित येण्यासाठी संघटना नाही, याचा फायदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) घेतला आहे. जे संविधान मानत नाहीत ते आमचे शत्रू असून त्यांच्याविरोधातील असंतोष संघटीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरएसएसला पराभूत करण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. जोपर्यंत शरद पवार आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू, असा विश्वास पद्मश्री लक्ष्मण माने यांनी व्यक्त केला आहे.
पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज मुंबईत आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, तसेच राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. लक्ष्मण माने यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लक्ष्मण माने यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर त्यांनी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वगृही येण्यामागची भूमिका विषद केली. पद्मश्री माने म्हणाले, दलितांमध्ये एकत्रित येण्यासाठी संघटना नाही, याचा फायदा आरएसएसने घेतला आहे. आरएसएसचे ऑडिट होत नाही. राज्यघटना, न्याय व्यवस्था, लोकशाही आरएसएस मानत नाही. मग, या संघटनेला दहशतवादी म्हणून का घोषित केले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात आएसएसचा सहभाग होता. जे संविधान मानत नाहीत ते आमचे शत्रू आहे. त्यांच्याविरोधातील असंतोष संघटीत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आरएसएसला पराभूत करण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. हा प्रश्न कोण्याएका जातीचा नाही, जाणव्याशी आहे, यज्ञ करणाऱ्यांशी आहे.
आगामी काळात विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करून दाखवू, असा शब्द देऊन त्यासाठी बहुजनांना एकत्रित यावेच लागेल. आगामी काळात शरद पवार असेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबतच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लक्ष्मण माने यांच्यासमवेत काही निवडक समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.