Maratha Reservation News: पंकजा मुंडेनंतर खासदार मुंडेंनाही ‘चले जाओ’; अंबाजोगाई तालुक्यात 18 जणांविरुद्ध गुन्हा

Pankaja Munde Politics : बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचाच काहीसा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरदेखील येत आहे.
Pritam Munde Pankaja Munde
Pritam Munde Pankaja Mundesarkarnama
Published on
Updated on

Ambajogai News : मराठा आरक्षण मुद्द्यावर समाज बांधव प्रचंड आक्रमक आहेत. भेटीगाठी दौऱ्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. यानंतर त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाही ‘चलो जाओ’च्या नाऱ्यांचा सामना करावा लागला. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात 18 जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून समाज बांधव आक्रमक आहेत. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल होऊनही समाज मनातील चीड कायम असल्याचे वारंवार दिसून येते. पंकजा मुंडे यांना बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथे तरुणांनी काळे झेंडे दाखविले होते. यावरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Pritam Munde Pankaja Munde
Nanded Loksabha Constituency : 'फडणवीसांनी काही सांगितलं अन् मी ऐकलं नाही असं कधीच झालं नाही'; चव्हाण यांचे मोठे विधान !

त्यानंतर केज तालुक्यातील पावनधाम येथे पंकजा मुंडे यांना जात असताना त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्यावरून पुन्हा 55 जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. आता त्यानंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे भेटीगाठीसाठी गेल्यानंतर ‘चलो जाओ’ अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गणेश गगणे, विवेक बाळासाहेब गगणे राडी येथील शुभम श्रीरंग गगणे, महेश गगणे, सुशील गगणे, अरुण गगणे, शैलेश गगणे, परमेश्‍वर गगणे, युवराज कोळगे, बालाजी गगणे, दत्तात्रय गगणे, आदर्श गगणे, श्रीहरी गगणेसह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)

नेमकं काय घडलं होतं?

बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचाच काहीसा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरदेखील येत आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) या प्रचारासाठी जात असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. या दरम्यान पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवत, एक मराठा लाख मराठा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

अखेर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवावे लागले. मात्र, आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलक नसून विरोधी राजकीय पक्षांचे लोक असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर केला आहे. याबाबत आपण पोलिसांकडून माहिती घेणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Pritam Munde Pankaja Munde
Nanded Loksabha Constituency : 'फडणवीसांनी काही सांगितलं अन् मी ऐकलं नाही असं कधीच झालं नाही'; चव्हाण यांचे मोठे विधान !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com