Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या ‘डायरी’ ‘बॉम्ब’मुळे कुणाला कानठळ्या बसणार?

Anil Deshmukh's Book Release: विधानसभा निडवणुकीच्या दरम्यान ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ हे पुस्तक ते प्रकाशित करणार आहेत. यातून देशमुख 14 महिने तुरुंगात असताना किती षडयंत्र रचले? कसा छळ केला? हे सांगणार आहेत.
anil deshmukh
anil deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्यावर भाजपनेच दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात खोटे शपथपत्र लिहिण्यास सांगण्यात आले होते. त्यास नकार दिल्याने जेलमध्ये टाकण्यात आले होते, असे आरोप यापूर्वीच राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांनी केले होते.

आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत देशमुख  ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर' हे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. त्यातून अनेक धक्कादायक आणि खळबजनक माहिती समोर येण्याची शक्यता असून ते कोणावर ‘बॉम्ब’ टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मध्यंतरी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होत्या. फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपल्या विरोधात षडयंत्र रचले होते. तत्कालीन मुंबईच्या पोलिस आयुक्तांना आरोप करायला लावले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात शपथपत्र लिहून देण्यास सांगण्यात आले होते. याकरिता फडणवीस यांचा माणूस दोन वेळा आपल्याकडे आला होता, असे आरोप देशमुखांनी केले होते.

तेव्हा फडणवीस यांनी देशमुख ( Anil Deshmukh ) गृहमंत्री असताना काय करत होते? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत काय बोलत होते, याचा ‘पेनड्राईव्ह’ आपल्याकडे असल्याचे सांगितले. हे शाब्दिक युद्ध अनेक दिवस चालले. आता देशमुख हे नव्याने या वादाला तोंड फोडणार असल्याचे दिसून येते.

anil deshmukh
anil deshmukhsarkarnama

विधानसभा निडवणुकीच्या दरम्यान ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ हे पुस्तक ते प्रकाशित करणार आहेत. यातून  देशमुख 14 महिने तुरुंगात असताना किती षडयंत्र रचले? कसा छळ केला? हे सांगणार आहेत. तुरुंगात असताना अनेक वृत्तपत्राचे कात्रणे व अनेक संदर्भ त्यांनी गोळा केले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यावर या पुस्तकाला अंतिम स्वरुप दिले असून हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात लवकरच ते करणार आहेत.

देशमुख म्हणाले, “तुरुंगात असताना हे पुस्तक लिहण्यास सुरुवात केली. मला अडकविण्यासाठी कोणी व कसे षडयंत्र रचले,  यानंतर माझ्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम करीत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे कसे आणि कोणाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.”

anil deshmukh
NCP Sharad Pawar: तुतारी की पिपाणी..? लोकसभेला दगाफटका; विधानसभेलाही उडणार गोंधळ, पवारांची 'ती' मागणी आयोगाकडून अमान्य

मधल्या काळात याबाबत काही गोष्टींचा खुलासा देशमुखांनी केला होता. तेव्हा अनेकांनी विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने बोलत आहात का? असा प्रश्न केला होता. यावर देशमुख म्हणाले, “तुरुंगात लिहलेल्या पुस्तकाला मी बाहेर आल्यावर अंतिम रूप देण्यासाठी वेळ लागला. पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्याला सर्व खुलासे करायचे होते. परंतु, काही चुकीची माहिती जनतेसमोर येत असल्यामुळे काही घटनांवर बोलावे लागले.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com