Bawankule on Anil Deshmukh : अनिल देशमुख सध्या जमानतीवर बाहेर आहेत, त्यांनी ‘ऑर्डर’ नीट वाचली नाही, असं वाटतंय !

Anil Deshmukh : जमानतीच्या अटीशर्तींचा ते भंग करत आहेत.
Chandrashekhar Bawankule and Anil Deshmukh
Chandrashekhar Bawankule and Anil DeshmukhSarkarnama

Nagpur Political News : अनिल देशमुख सध्या जमानतीवर बाहेर आहेत. त्यांनी ऑर्डर नीट वाचली नाही, असं वाटतंय. जमानतीच्या अटीशर्तींचा ते भंग करत आहेत. अनिल देशमुख आमचे मित्र आहेत. म्हणून त्यांना सांगणे आहे की, अटींचा भंग करू नका, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (They are violating bail conditions)

आज (ता. २६) सकाळी कोराडी येथील निवासस्थानी आमदार बावनकुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी शरद पवार यांना काही बोललो नाही, तर त्यांच्या भूमिकेवर बोललो. शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही म्हणाले की, पक्षात फूट पडली नाही, त्यावर मी बोललो शरद पवार यांनी घूमजाव केले. असो निर्णय घ्यायचा अधिकार त्यांचा आहे, तो त्यांना घ्यावा.

या देशासाठी आणि तमाम देशबांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की, भारत चंद्रावर पोहोचला. पंतप्रधानांना पाठबळ दिल्यानं ही मोहीम यशस्वी झाली. त्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणे, कौतुक करणे, ही नैतिकता आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इस्रोमध्ये गेले. पण विरोधी पक्षाचे नेत्यांना ते सहन होत नाही, कारण गेल्या ६५ वर्षात त्यांनी कधी अस केलंच नाही, असे बावनकुळे म्हणाले.

आज काँग्रेस ढासळलेल्या अवस्थेत आहे. भाजपला जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून त्यांचा पायाखालची वाळू सरकली आहे, भीतीपोटी त्यांचे नेते काहीही विधाने करत सुटले आहेत. भारतीय जनता पक्षाचा इतिहास गौरवशाली आहे. आम्हाला जन्मजात काही मिळालं नाही. काँग्रेस बरखास्त करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते, पण पिढ्यान्पिढ्या लोक पक्षात येत आहे आणि पक्ष तसाच आहे, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेस नेत्यांवर टिका केली.

Chandrashekhar Bawankule and Anil Deshmukh
Bawankule On Sanjay Raut: ठाकरेंचे भरकटलेले 'यान' काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल; बावनकुळेंचा राऊतांना चिमटा

२८ लोकसभा मतदारसंघांत प्रवास करत असताना आज पाचव्या लोकसभा मतदारसंघात जात आहे. लोक मोदींना मते द्यायला तयार आहेत. मध्यमवर्गीय व्यक्ती मत द्यायला तयार आहे. जनतेच्या मनात काय, हे महत्वाचे आहे. आज समोर न येणारे लोकही मोदींना मतदान करतील, असा विश्‍वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.

वडेट्टीवारांना शरद पवार कळलेच नाही..

वडेट्टीवार नवीन नवीन विरोधी पक्षनेते झाले आहेत. मी सर्वात ॲक्टिव्ह नेता, मोठा नेता असल्याच राहुल गांधींना दाखवावं लागतं. जनतेला पटत नाही, असे ते बोलत असतात. वडेट्टीवार ईडी सीबीआयवर असा अविश्वास दाखवणार असतील. तर देशात काहीच राहणार नाही. लोक भ्रष्टाचार करतील तर वाळू माफिया आणि दारू माफिया तयार होतील. वडेट्टीवार यांना शरद पवार समजले नाही, असा टोला बावनकुळेंनी वडेट्टीवारांना लगावला.

Chandrashekhar Bawankule and Anil Deshmukh
Wadettiwar on BJP : घर चलो अभियान नाही, तर ही अखेरची घरघर; ‘मसीहा’ येताच किती ‘आऊट’ झाले, देशाने पाहिले !

वडेट्टीवारांना चांगले भविष्य..

उद्या काय बोलायचं हे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) रात्री लिहून काढतात. भाजप (BJP) त्यांचा क्रमांक एकचा शत्रू असल्यानं ते आमच्याबद्दल सतत बोलत असतात. त्यांना लिहून काढावं लागतं. आम्हाला लिहून काढावं लागत नाही. वडेट्टीवार अत्यंत उत्साहात आहे. ते चांगलं काम करत आहेत. त्यांचं स्वागत करतो. पुढे ते असंच काम करत राहिले तर काँग्रेसमध्ये त्यांना पुढे चांगलं भविष्य आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com