Bawankule On Sanjay Raut: ठाकरेंचे भरकटलेले 'यान' काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल; बावनकुळेंचा राऊतांना चिमटा

Maharashtra Politics : आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली..
Chandrashekhar Bawankule and Sanjay Raut.
Chandrashekhar Bawankule and Sanjay Raut.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: चांद्रयान मोहीमेवरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी समाचार घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर त्यांनी निशाणा साधत त्यांची खिल्ली उडवली.

"उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. अन्यथा ठाकरे गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल," असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे. त्यांनी टि्वट करीत राऊतांवर जहरी टीका केली आहे.

Chandrashekhar Bawankule and Sanjay Raut.
Sharad Pawar News : शरद पवारांचे मोठं विधान ; अजित पवार हे आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही..

बावनकुळे म्हणाले," कांद्या प्रश्नांवर फडणवीसांनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली,"

Chandrashekhar Bawankule and Sanjay Raut.
Rahul Kul News: भाजप आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का; भीमा पाटस कारखान्याचे साहित्य जप्त करा, साखर आयुक्तांचा आदेश

बावनकुळे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात..

ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज 'चांद्रयान'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. कोरोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.

संपूर्ण जगात चांद्रयानच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं, पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com