Anil Deshmukh News : '१४ महिने जेलचा भत्ता खाल्लोय, कुणी माय का लाल अनिल देशमुखला रोखू शकत नाय,' ; सत्ताधाऱ्यांना खुला इशारा!

Mahavikas Aghadi News : माझ्यावर चार्जशीट १०० कोटीची नाही तर,१ कोटी ७१ लाखाची
Anil Deshmukh News :
Anil Deshmukh News : Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) 'वज्रमूठ सभा' सभा पार पडली. यांनतर आता नागपूर शहरातही (Nagpur City) महाविकास आघाडीला वज्रमूठ सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीचे मुख्य नेते उपस्थित राहिले आहेत. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री यांनी आपल्यावर झालेली ईडीची कारवाऊ चुकीची होती, असे म्हंटले आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, "महाविकास आघाडीच्या या सभेत मी सर्वांचा स्वागत करतो. मी गृहमंत्री होतो, पण मला खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्यात आले. माझ्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप केले. तेव्हा मी स्वत: माझी चौकशी करा अशी भूमिका ठेवली होती. या प्रकरणी दूध का दूध पाणी का पाणी करा असं मी म्हंटलो होतो."

"एक वर्ष माझी कथित १०० कोटी वसूली प्रकरणी चौकशी झाली. ईडी, सीबीआय, न्यायमूर्ती चांदीवाल समितीची चौकशी करण्यात आली. यानंतर माझ्यावर चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आले. यानंतर याप्रकरणी जो निकाल आला, त्यात देशमुखांवर जो आरोप झालेत, ते केवळ ऐकीव माहितीवर आहेत. या आरोपाचे कोणतेही पुरावे नाहीत. ज्यांनी देशमुखांवर आरोप केले त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही," असे अनिल देशमुख म्हणाले.

"माझ्यावर चार्जशीट १०० कोटीची नाही तर,१ कोटी ७१ लाखाची चार्जशीट दाखल करण्यात आली. मात्र याचेही पुरावे कोर्टासमोर आले नाही. माझ्यावर ज्यांनी आरोपते कोर्टात हजर होऊ शकले नाहीत. अशा पद्धतीने खोट्या आरोपात मला अडकवण्यात आलं," असं अनिल देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख पुढे म्हणाले की, "१४ महिने जेलचा भत्ता खाऊन मी बाहेर आलो, आता कोणी माय का लाल अनिल देशमुखांना मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही. संभाजीनगरची विराट सभा पाहून काही जणांच्या पायाखालची माती सरकली, आजही ची सभाही ऐतिहासिक आहे," असे देशमुख यांनी विरोधकांना थेट आव्हानच दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com