Anil Deshmukh News: ‘समझोता करणार नाही’, असे म्हटल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली !

Nagpur Political News : परमवीर सिंह याला खोटे आरोप करायला लावले.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur NCP News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ईडी आणि सीबीआयच्या धाकाने दुसऱ्या पक्षात गेले गेले, असे काल (ता. २०) शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी माझेही नाव घेतले. पवारांनी खरी माहित दिली, असे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख म्हणाले. (Senior leaders moved to other parties on the threat of ED and CBI)

आज (ता. २१) सकाळी नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘त्या’ प्रकरणासाठी माझ्यावरही भाजपच्या नेत्यांचा समझोता करण्यासाठी दबाव होता. पण त्यांना मी नकार दिला. त्यामुळे परमवीर सिंह याला खोटे आरोप करायला लावले आणि कारवाई करायला लावली. मी सरळ सांगितले होते की, समझोता करणार नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली आणि कारवाई करण्यात आली.

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना आमदार देशमुख म्हणाले, सर्वांना कल्पना आहे की, महाराष्ट्रात स्वतःच्या बळावर सरकार आणण्याची ताकद आजघडीला कुण्याही राजकीय पक्षात नाही. पूर्वी काही पक्षांकडे तशी ताकद होती. पण आज कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता आणू शकत नाही. ३५ते ४० वर्षांपासून वळसे पाटील पवारांसोबत काम करत आहेत. पवारांबाबत बोलताना त्यांनी तारतम्य पाळले पाहिजे. ते असेच वक्तव्य करीत राहिले तर त्यांच्याच जिल्ह्यातील लोक त्यांना धडा शिकवतील.

कांद्याचे दर पडल्यावरून देशात राजकारण तापत आहे. याबाबतीत विचारले असता, कांद्याच्या निर्यातीमध्ये ४० टक्के कर लावण्यात आला. त्यामुळे निर्यात खर्च वाढला. निर्यात झाली असती तर कांद्याला चांगला भाव मिळाला असता. पण केंद्र सरकारने निर्यात कर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मागे महाराष्ट्रात कापसाच्या बाबतीतही तेच घडले. कापूस आयात करण्यासाठी जो ११ टक्के कर होता, तो केंद्र सरकारने रद्द केला.

Anil Deshmukh
Anil Deshmukh यांनी सांगितली भाजप आणि शिंदे गटातली अंदर की बात | NCP | BJP | Shivsena | Sarkarnama

कापसाची आयात परदेशातून मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे कापसाचे भाव गडगडले. कापसाची निर्यात परदेशात झाली नाही. त्यामुळे कापसाचे भाव पडले. आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादकांचे नुकसान केंद्र सरकारने केले.

आता कांदा उत्पादकांचे नुकसान सरकारने (Central Government) केले. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांना (Farmers) कांदा, कापूस आणि सर्वच पिकांना चांगला भाव मिळाला पाहिजे. हे धोरण सरकारने मागे घेतले पाहिजे, असेही आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com