Anil Deshmukh News : घड्याळाचे 'काटे’ फिरविण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव !

Anil Deshmukh News : त्यांची वक्तव्यं शंकेला वाव देणारी आहेत.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Anil Deshmukh News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह मिळावे, यासाठी दिल्लीकरांच्या मदतीने शिंदे गटाने निवडणूक आयोगावर दबाव आणला. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे ‘काटे’ आपल्याकडे फिरावे म्हणून काही जण तशाच पद्धतीने आयोगावर दबाव आणत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी केला.

चिन्ह व पक्ष आम्हालाच मिळणार, ही त्यांची वक्तव्यं शंकेला वाव देणारीच असल्याचेही आमदार देशमुख म्हणाले. आज (ता. सहा) सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चिन्ह आणि पक्ष आपल्यालाच मिळणार, असा दावा करणे म्हणजे परीक्षेला बसण्यापूर्वीच आपण मेरीटमध्ये आलोय, हे सांगण्यासारखं आहे. दिल्लीतील सत्तेच्या मदतीने निवडणूक आयोगावर दबाव आणण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेंच्या प्रकरणातही तेच झालं. आता राष्ट्रवादीच्या बाबतही तेच होत आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता निष्पक्षपणे निर्णय द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली. निवडणूक आयोगाने नियमाच्या आधारे काम केल्यास शरद पवार यांच्याकडेच पक्ष व चिन्ह राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी निवडणूक आयोगाला त्यांनी हातही जोडत विनंतीही केली. सुनावणी सुरू असताना कोणताही नेता असे ठामपणे कसे सांगू शकतो, की चिन्ह व पक्ष त्यांना मिळणार आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दादांचे खच्चीकरण...

भाजपचे नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. आपला प्रतिस्पर्धी ताकदवान होऊ नये म्हणून काहींनी त्यांची खाती काढली. आता त्यांचं पालकमंत्रिपदही काढून घेण्यात आलंय. भाजपमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचा सातत्याने अपमान सुरू आहे. दादांची चांगलीच कोंडी करण्यात येत असल्याचे सांगत आमदार देशमुख यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

राज्याकडे दुर्लक्ष...

भाजपचे सध्या केवळ फोडाफोडी करून सत्ता मिळविण्याकडेच लक्ष आहे. राज्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेती उत्पादकांना मदत मिळालेली नाही. महिलांवरील अन्याय वाढले आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्यापेक्षा खुर्ची महत्त्वाची असल्याची परखड टीकाही आमदार अनिल देशमुख यांनी केली. अस्थिर राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री कोण आहे, यावरून काही फरक पडत नाही. पण सरकारने संकटात असलेल्या नागरिकांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना मदत करायलाच पाहिजे, असेही देशमुख म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Anil Deshmukh
Anil Deshmukh News : माजी गृहमंत्री का म्हणाले, आरोग्यमंत्र्यांना नारळ द्या? नांदेडमधील घटनेवरून वाक् युद्ध पेटले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com