Telhara APMC Election: तापत्या उन्हात उमेदवारांची कसोटी, तालुक्यात खलबते सुरू !

Telhara News: खुर्ची मिळविण्यासाठी तालुक्यातील सहकार नेते जागृत झाले आहेत.
Telhara APMC
Telhara APMCSarkarnama

Akola District's APMC Election News: तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकंदरीत पद मानाचे आणि तेवढेच कमाईचे असल्याने बाजार समितीची खुर्ची मिळविण्यासाठी तालुक्यातील सहकार नेते जागृत झाले आहेत. कोणत्याही एका पॅनलकडून आपले जमले पाहिजे यासाठी इच्छुक उमेदवारांनी पॅनल प्रमुखासोबत उठबस सुरू केली, मनधरणीसुद्धा सुरू केली आहे. (The candidates started the sitings with the panel heads)

अकोला (Akola) जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर साम, दाम, दंडाचा वापर ऐनवेळी होणार असल्याने मतदारसुद्धा सावध भूमिकेत आहेत. पाच वर्षांनंतर आलेल्या संधीचे सोने शेवटच्या दोन दिवसांत मतदार करणार असल्याची चर्चा सुरू आहे. पाच वर्षांत आले उखळ पांढरे करणारे उमेदवार सध्या मतदारांच्या रडारवर आहे. कुणाला शब्द न देणे कुणासोबत उघड प्रचार न करणे, या बाबींवर कटाक्षाने मतदार लक्ष देऊन आहेत.

एकदा बाजार समितीची निवडणूक झाली की, मतदारांकडे पाठ फिरविणाऱ्याची संख्या कमी नाही. बस त्यांना एकच काम शिल्लक राहते, ते म्हणजे आपले उखळ पांढरे करणे. यामुळे या उमेदवारांना कैचीत पकडण्यासाठी मतदारांकडे शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. या दहा दिवसांत मतदार उमेदवारांची चांगलीच मजा घेणार, असं दिसतंय. ही निवडणूक चांगलीच गाजणार असून, ऐन वेळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक वापर होणार असल्याने एक-एक उमेदवाराला लाखोंचा खर्च करावा लागेल, असे चित्र आहे.

ऐपत नसलेल्या उमेदवारांचा मोठा पेच निर्माण झाला असून, निवडणुकीचे मैदान गाजवावे की, मैदान सोडावे, या द्विधा मनःस्थितीत इच्छुक उमेदवार दिसून येत आहेत. मतदाराला उमेदवाराचे काही देणे-घेणे नाही. शेवटच्या रात्री कितीने आपले भले होते, याची अनेक मतदारांना उत्सुकता असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. ज्या पद्धतीने खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत ऐनवेळी पैशांचा मोठा वापर झाल्याने त्याहीपेक्षा जास्त वापर शेवटच्या दोन दिवसांत बाजार समितीच्या निवडणुकीत होणार असल्याने मतदार आता सावध भूमिकेत आहेत.

Telhara APMC
APMC Achalpur Election : तिसऱ्या गटाची एन्ट्री, इच्छुकांच्या माघारीसाठी नेत्यांची कसरत !

मतदाराची संस्था मोठी असून, शेवटच्या दहा दिवसांत उमेदवाराची चांगलीच दमछाक होणार आहे. सूर्य प्रचंड आग ओकत आहे, तर दुसरीकडे मतदारांना भेटण्यासाठी वेळ कमी असल्याने उमेदवारांची तापत्या उन्हात दमछाक होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाची लॉटरी लागणार, हे येणारा काळच सांगेल.

दहा दिवसांच्या या काळात मतदाराचे लाड पुरविताना उमेदवारांची त्रेधातिरपीट उडणार आहे. मतदाराची सरबराई, सकाळ-संध्याकाळ जेवणावळी, ओली पार्टी, मतदारांना हॉटेलपर्यंत ने-आण करण्यासाठी गाड्यांचा ताफा या सर्व खर्चावर उमेदवारांची चांगलीच परीक्षा होणार आहे.

आपले सहजा-सहजी जमते या भ्रमात इच्छुक उमेदवार असले, तरी निकाल लागल्यावर अनेकांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. गावा-गावांतील मतदाराचा गट आपल्या बाजूने आहे, हा भ्रम असला तरी आता तशी परिस्थिती कुठेच राहिलेली नाही. मतदार स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम असल्याने तो कुणाला झुकते माफ देईल, हे शेवटच्या क्षणीच दिसून येईल.

Telhara APMC
APMC Election Bori : तीन झाले बिनविरोध, १५ जागांसाठी महाविकास आघाडीतच रंगतोय सामना !

अशी आहे बाजार समिती सभासदांची संख्या..

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी लढण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (APMC Election) तालुक्यातील विविध गावांतील सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांना मतदानाचा अधिकार असून, त्याची संस्था ४४८ आहे, तर ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ५८१ असून, हमाल तोलारी मतदार ३०३, व्यापारी मतदार संघातील संख्या ८५ आहे. या सर्व मतदारांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Election) मतदानाचा अधिकार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com