APMC Kuhi Election
APMC Kuhi ElectionSarkarnama

APMC Election : कॉंग्रेसने दिला धोका; मग राष्ट्रवादीनेही उतरवले उमेदवार, अन् महाविकास आघाडी फुटली !

Congress : कॉंग्रेसने अचानक सहकार पॅनलच्या नावाखाली १५ उमेदवार रिंगणात उतरवले.

Nagpur District Kuhi APMC Election : नागपूर जिल्ह्यातील कुही बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. कॉंग्रेसने १३ आणि राष्ट्रवादीने दोन जागा लढविण्यावर एकमत झाले असताना अचानक कॉंग्रेसने सहकार पॅनलच्या नावाखाली १५ उमेदवार रिंगणात उतरवल्याने वादाची ठिणगी पडली. (There is a split in Mahavikas Aghadi)

कुही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ जागांसाठी २८ एप्रिलला मतदान होत आहे. या बाजार समितीवर सुरुवातीपासून कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, यावेळी राज्यात महाविकास आघाडी असल्याने आणि आगामी निवडणुकांपर्यंत ती टिकवून ठेवायची आहे. म्हणून बाजार समित्यांच्या निवडणुका एकत्र लढविण्यावर भर देण्यात आला.

याकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये आघाडीबाबत बोलणी झाली. त्यामुळे १५ जागा कॉंग्रेस लढविणार असून दोन जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात येणार होत्या. याकरिता कॉंग्रेसचे नेते राजेंद्र मुळक तसेच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यात झालेल्या चर्चेअंती १३ जागा कॉंग्रेस व दोन जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार होते.

वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बोलणीनंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना अंधारात ठेवण्यात आले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुरुवातीला राष्ट्रवादीच्या सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र, कॉंग्रेसने आपले १५ उमेदवार सहकार पॅनलच्या नावाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.

APMC Kuhi Election
Amravati APMC Election : ठाकुरांच्या माजी संचालकांचा राणांच्या छावणीत आश्रय, अमरावतीत कडवी झुंज !

ऐनवेळी झालेल्या या प्रकारामुळे राष्ट्रवादीनेसुद्धा तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. राष्ट्रवादीचे जीवनलाल डोंगरे, विनोद हरडे, वंचित आघाडीचे अशोक रामटेके यांचा यात समावेश आहे. तिन्ही उमेदवार सेवा सहकारी सर्वसाधारण गटातून निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येईल, असं दिसतंय.

ही निवडणूक (APMC Election) पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. पण राजकीय (Political) पक्षांचा यात थेट हस्तक्षेप असतो. कारण या निवडणुकीवर (Election) बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बाजार समिती निवडणुकांचे निकाल आगामी जिल्हा परिषद, (ZP) नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकींवर प्रभाव पाडणार आहे. कोण किती पाण्यात, याची चाचणी या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे कुठे भाजप-कॉंग्रेस तर कुठे शिंदे-ठाकरे अशी युती या निवडणुकीत बघायला मिळत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com