Amravati APMC Election: प्रहारसोबत जाण्यास वरिष्ठांची मनाई, अमरावती बाजार समितीत ठाकरे गटाची परीक्षा !

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या विरोधात जात बळीराजा पॅनेल मैदानात आणले.
Amrvati APMC
Amrvati APMCSarkarnama
Published on
Updated on

Amravati District Bazar Samiti News: अमरावती बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात शिवसेनेच्या ठाकरे गटातील एका गटाने स्वतंत्र चूल मांडत तिसरे पॅनेल जाहीर केल्याने तिरंगी आता तिरंगी लढत होत आहे. ठाकरे गट, महाविकास आघाडीचे सहकार आणि भाजपप्रणीत शेतकरी व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बळीराजा, असे तीन पॅनेल मैदानात आले असून वर्चस्वासाठी कडवी झुंज होणार आहे. (There will be a bitter fight for supremacy)

माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, सुनील वऱ्हाडे, प्रीती बंड व नाना नागमोते महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. तर त्यांच्या विरोधात आमदार रवी राणा, सहकार नेते विलास महल्ले, प्रकाश साबळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, किरण पातुरकर हे शेतकरी पॅनलचे नेतृत्व करीत आहेत.

शिवसेनेच्या एका गटाने महाविकास आघाडीच्या विरोधात जात बळीराजा पॅनेल मैदानात आणले असून जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी या पॅनलचे नेतृत्व करीत आहेत.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने यापूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षासोबत हात मिळवून पॅनेल मैदानात आणण्याचे प्रयत्न केले होते. मात्र याची तक्रार संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी स्वतंत्र पॅनेल लढविण्याची मुभा देत प्रहारसोबत कोणत्याही स्थितीत हातमिळवणी करायची नाही, असा दम भरला. त्यामुळे असंतुष्टांना हाताशी धरत बळीराजा पॅनलचा जन्म झाला.

Amrvati APMC
Amravati APMC Election : ठाकुरांच्या माजी संचालकांचा राणांच्या छावणीत आश्रय, अमरावतीत कडवी झुंज !

उद्धव ठाकरे गटाच्या या पॅनलने दहा उमेदवार उभे केले असून सेवा सहकारी मतदारसंघात सहा, ग्रामपंचायतीमध्ये तीन व अनुसूचित जाती जमातीमधून एका उमेदवाराचा समावेश आहे. प्रहारसोबत लढल्यास चांगली लढत देणे शक्य होते. पण राज्य पातळीवर विरोधात असलेल्या प्रहार पक्षासोबत लढायचे नाही, असे खासदार सावंत (Arvind Sawant) यांनी ठणकावून सांगितल्यामुळे स्थानिक नेत्यांचा नाइलाज झाला आणि ते स्वतंत्रपणे मैदानात उतरले. अमरावती बाजार समितीमध्ये (APMC Election) एकट्याने लढणे तेवढे सोपे नाही. त्यामुळे ठाकरे गट किती जोर लावणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीने पॅनेल

गतवेळी बाजार समितीत सेनेचे सहा संचालक निवडून आले होते. मविआप्रणीत (Mahavikas Aghadi) सहकार पॅनलमध्ये तेवढ्या जागा देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी निम्म्याच तीन जागा दिल्या. एकतरी जागा वाढवून द्या, अशी विनंती केली. मात्र ती अव्हेरल्या गेल्याने पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा प्रकार घालून त्यांच्या मंजुरीने बळीराजा पॅनलची निर्मिती केली. या पॅनलमध्ये सर्व उमेदवार ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचेच आहेत, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com