Akola District APMD Election News : राज्यातील राजकारणाचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटत आहेत. सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय येत आहे. राज्यात शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्तेपासून वंचित करण्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या ‘प्रहार’सह कोणत्याही राजकीय पक्ष किंवा गटासोबत युती करायची नाही, असा दमच पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांनी भरला आहे. (Shiv Sena has started taking cautious steps)
अकोला जिल्ह्यासह राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा फड रंगला आहे. थेट राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविली जाणार नसली तरी यावर्षी सहकार क्षेत्रामध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप उघडपणे वाढला आहे. त्यामुळे ‘सहकारा’चे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष म्हणून लढत नसले तरी सरकार क्षेत्रात पाय जमविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
त्यातूनच स्थानिक पातळीवर बाजार समितीसाठी युती-आघाडी करताना शिवसेनेने सावध पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम विदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने सहकार क्षेत्रात उडी घेतली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून त्यांनी घेतलेली ‘एन्ट्री’ सहकार क्षेत्रात पाय रुजविणारी ठरली. त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ‘प्रहार’कडून युती-आघाडीसाठी हात मिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी असे आदेश दिल्याच्या अफवा उठत असल्याने खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधून पाठविलेल्या संदेशात ‘प्रहार’ सोबत जाण्याचा कुठलाही सल्ला वा आदेश मी दिलेला नसल्याचे सांगितले.
‘हे’ पक्ष चालतील, भाजप, प्रहार नकोच!
शिवसेनेसोबत असणारे वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड अशा पक्षांसोबत युती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार पॅनलने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. ही युती करीत असताना भाजप वा त्यांना समर्थन देणाऱ्या ‘प्रहार’ वा अन्य कोणत्याही पक्षाशी युती करू नये, असे खासदार सावंत यांनी स्पष्ट सांगितले.
आघाडीतील घटक पक्ष सोबत येत नसतील तर शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवावी, पण भाजप किंवा प्रहार सोबत जावू नये, असा आदेश खासदार सावंत यांनी दिला आहे. अशी युती केली असेल त्यांना माघार घेण्यास सांगणे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार..
शिवेसना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती वा अन्य कोणत्याही निवडणुका (Elections) या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणूनच लढायच्या असल्याचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी त्यांच्या संदेशात स्पष्ट सांगितले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.