Arni APMC Election : आर्णी बाजार समितीमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, ‘त्या’ गोल्डन मॅनची चर्चा...

Congress : कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीची सत्ता कायम राहिली.
Arni APMC
Arni APMCSarkarnama

Yavatmal District's Arni APMC Election : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ती चुरशीची लढत यावेळी बघायला मिळत आहे. आजपर्यंत बाजार समितीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीची सत्ता कायम राहिली. पण यावेळी सर्वसामान्य लोकांना उमेदवारी देऊन शेतकरी परिवर्तन पॅनलने रंगत आणली आहे. (The Farmer Transformation Panel made this election Interesting)

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तालुक्यातील मात्तबर लोकांना उमेदवारी मिळाली की ते उमेदवार निवडून यायचे आणि सत्ता काबीज करायचे. परंतु यावेळी सर्व सामान्य लोकांचे पॅनल म्हणून शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला उमेदवारी दिली. त्यांचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी करीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे काही नाराज नेत्यांनी सोबत घेऊन शेतकरी परिवर्तन विकास आघाडी पॅनल उभे केले.

(BJP) भाजपशिवसेना (शिंदे गट) (Eknath Shinde) यांनी शेतकरी न्याय हक्क आघाडी पॅनल उभे करून निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक गट ग्रामपंचायत सदस्य गट, हमाल मापारी गट, व्यापारी मापारी गट असून मोजकेच मतदार असतात. त्यामुळे पक्षातील श्रीमंत लोकांनाच उमेदवारी मिळत असते.

यावेळी तिहेरी लढत होत आहे. सर्व सामान्य माणसाला उमेदवारी मिळाली. परंतु आता शेवटचे दोन दिवस राहिले असल्याने निवडणुकीतील (APMC Election) मात्तबर हे धनशक्तीचा वापर करून निवडून येतील, अशी चर्चा रंगली आहे. असे झाल्यास सर्वसामान्य माणूस यापुढे निवडणुकांमध्ये (Elections) रस घेणार नाही, असे बोलले जात आहे.

Arni APMC
Arni APMC Election : सहकारी संस्थेच्या जागा हडपणारेही उतरले बाजार समितीच्या निवडणुकीत !

‘तो’ गोल्डन मॅन कोण ?

एका पॅनलमधील उमेदवाराने तर पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष निधी दिला, अशी चर्चा तालुक्यात आहे. हा व्यक्ती तालुक्यात गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो. तो धनशक्तीचा वापर करून स्वतः निवडून येणार असल्याचे भाकीत करत आहे. तसा विश्वास तो इतरांना बोलून दाखवत आहे. पॅनलमधील इतर निवडून येतील की नाही, हे या गोल्डन मॅनला माहिती नाही. पण स्वतःसाठी मात्र मोठमोठ्या शर्यतीसुद्धा लावायला तयार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com